(क्राईम रिपोर्टर )न्यायालयता चालू असलेली कौटुंबिक हिंसाचाराची केस मागे घ्यावी, यासाठी महिलेला शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २१ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश पवार, नंदु पवार, अंजली मोरे आणि अॅड. सुनील कडसकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील असलेल्या वरंड्यामध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या घराच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती.त्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला होता.या खटल्याच्या तारखेसाठी त्या न्यायालयात आल्या होत्या.त्यावेळी कोर्टाचे बाहेर असताना वकील सुनिल कडसकर व पती गणेश पवार याने फिर्यादी यांना केस मागे घे,म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. सासरे नंदु पवार याने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ केली.नणंद अंजली मोरे हिने फिर्यादीचे केस ओढुन मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.