( प्रतिनिधी,अभिजित सोनावळे) चाकण येथील प्रसिद्ध सुवर्णपेढी वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्स मधून नुकतेच ग्राहकाच्या चोरी गेलेल्या दागिन्याचा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केलेल्या रकमेचा धनादेश ग्राहकाला देण्यात आला. याबाबत बोलताना वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक नकुल दत्तराज वाफगांवकर यांनी सांगितले की, आमच्याकडे खरेदी केलेल्या दागिन्यांवर आम्ही ग्राहकांना मोफत इन्शुरन्स देतो .अशाच एका घटनेत कनेरसर ,तालुका खेड येथील दीपक गावडे यांनी सोन्याच्या गंठण दागिन्याची खरेदी केली होती. दुर्दैवाने त्यांच्या दागिन्याची चोरी झाली. याची माहिती आम्हाला मिळताच ग्राहकाला बोलावून पोलीस कम्प्लेंटच्या प्रतीसह , खरेदी केलेल्या दागिन्याच्या पावत्या व इतर आवश्यक कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीकडे जमा केले. इन्शुरन्स कंपनीने ग्राहकाचा क्लेम मंजूर करून संबंधित रकमेचा धनादेश ग्राहकाच्या नावे तयार केला .
आम्ही नेहमी ग्राहकांनी खरेदी
केलेल्या दागिन्यांची काळजी घेण्याच्या बद्दल आग्रही असतोच त्यामुळेच आम्ही ग्राहकांना इन्शुरन्सची मोफत सेवा देतो आहे. ग्राहकासोबत जेव्हा दागिन्याच्या चोरीची दुर्दैवी घटना घडते तेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून पैसे परत मिळवून देण्याने ग्राहकाला व आम्हालाही समाधान वाटते.घटनेबाबत बोलताना दीपक गावडे भावनाविवश झाले होते. त्यांनी सांगितले ,आम्ही आमचे दागिने चोरीला गेल्यानंतर खचलो होतो. पण वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सनी आम्हाला बोलावून, कागदपत्रे घेऊन ,चोरी गेलेल्या दागिन्यांच्या बदल्यात इन्शुरन्सच्या माध्यमातून आम्हाला झालेला आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मदत केली. यामुळे आमच्या परिवाराला आर्थिक समस्येतून बाहेर येण्यास हातभार मिळाला त्याबद्दल वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्स परिवाराचे आम्ही ऋणी आहोत.यावेळी वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्स चे संचालक दत्तराज मधुकर वाफगांवकर,नकुल दत्तराज वाफगांवकर,पुष्कराज वाफगांवकर व गावडे कुटुंबीय उपस्थित होते.