रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून डच्चू मिळणार? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद आले धोक्यात,पदावर काँग्रेसने घेतला आक्षेप
रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून डच्चू मिळणार? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद आले धोक्यात,पदावर काँग्रेसने घेतला आक्षेप
(वृत्त सेवा ) मागील वर्षांपासून राज्यातील राजकारणात मोठा बदल होत आहे कोण कधी काय आपली राजकीय भूमिका घेईल सांगता येत नाही . पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारले. त्यांच्यासोबत ४० आमदार आले. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आल्या. आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून गेल्या दोन तीन दिवसांपासून रुपाली चाकणकर आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात राजकीय जुगलबंदी सुरु आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांच्यावर टीका केली होती. मी आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगले काम करू शकतो. महिला आणि पुरुष यांच्यात काही फरक असतो ना, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. त्यावरुन अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनीही गोगावलेंचा समाचार घेतला आहे. गोगावलेंच्या वक्तव्यातून पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, असं टीकास्त्र चाकणकरांनी सोडले.
रुपाली चाकणकर अजित पवार यांच्या गटासोबत आल्या आहेत. त्यानंतरही त्यांचे पद धोक्यात आले आहे. त्यांच्या पदावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या संगिता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्या पदावर आक्षेप घेतला आहे.
संविधानिक पद असताना एखादी व्यक्ती राजकीय पद भूषवित असेल तर ते असंविधनिक आहे, असा दावा संगिता तिवारी यांनी केला आहे.काँग्रेस नेत्या संगिता तिवारी यांनी उच्च न्यायालयास रुपाली चाकणकर यांच्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, एखादी संविधनिक पदावरील व्यक्ती राजकीय पक्षाचे पद भूषवू शकत नाही. हा प्रकार असंविधनिक आहे. यामुळे चुकीचा पायंडा पाडला जाईल. मग उद्या राज्यपाल या पदावर असणारी व्यक्तीही एखादा राजकीय पक्षाचा अध्यक्ष होऊ शकेल. हा प्रकार कायदा आणि संविधानाला धरून नाही.रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. अजित पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे संगिता तिवारी यांनी तक्रार केली आहे. रुपाली चाकणकर यांच्याबाबत संविधान आणि कायद्यानुसार ताबडतोब निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे.