आषाढी एकादशी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पादुका असलेली शिवदिंडी शिवनेरी ते रायगड व रायगड ते पंढरपूर गेली होती.
ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पादुका असलेली शिवदिंडी परतीच्या प्रवासात आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे आली होती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिंडी सोबत अन्न प्रसादाचा कार्यक्रम किल्ले संग्रामदुर्ग मध्ये ठेवण्यात आला होता
कार्यक्रम सकाळी 11. 30 वाजता झाला.
परिसरातील सर्व शिवभक्तांनी आपला भाजी भाकरीचा डबा घेऊन किल्ले श्री संग्रामदुर्ग येथे उपस्थित राहून व शिवाजी महाराजांच्या पवित्र पादुका असलेल्या शिवदिंडी सोबत प्रसाद भोजनचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनॲड.किरण झिंजुरके
अध्यक्ष,किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठान, यांनी केले