(क्राईम रिपोर्ट) आंध्र प्रदेश राज्यातील पदेरू पोलीस स्टेशन, जिल्हा अलुरी सिताराम राजू, पोलीस स्टेशन हदीत दि. 25/06/2023 रोजी पदेरू पोलीसांनी अवैध गांजाची तस्करी करणारी महिंद्रा XUV 500 हो मधून 400 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा जप्त केला आहे.
सदर कारवाई दरम्यान पदेरु पोलीसांनी आरोपी मताम सोमादी रामचंद्र पाडल रा. गुंद्रमेता, मुचिगपुट मंडळ, नि अनुरो सिताराम राजू, राज्य आंध्रप्रदेश यास ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फिरोज अजीज बागवान रा. बारामती ता. बारामती जि. पूणे हा पळून गेला असल्याने एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी फिरोज बागवान हा बारामती परीसरात असल्याची पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परीसरात सापळा लावून वरील गुन्हयातील मुख्य आरोपी फिरोज अनोज बागवान रा. बारामती ता. बारामती जि पुणे यास दि. 7/7/2023 रोजी ताब्यात घेण्यात आले असून सदरच्या आरोपीस पदेरू पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अभिजीत सावंत सहा फौजदार हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकसिंगे, स्वप्निल अहिवळे, हेमंत विरोळे यांनी केली आहे.