(प्रतिनिधी, सम्राट राऊत ) चाकण शहरामध्ये रामनवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर चाकण पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने व अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये शहरातील मुस्लिम सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांकडून एकादशीच्या दिवशी कुर्बानी दिली जाणार नाही असा शब्द देण्यात आला होता, तशी बातमी ही प्रसिद्ध झाली होती. परंतु असा शब्द दिल्यानंतर देखील आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदर चाकणच्या गोरक्षकांनी भामा नदीच्या पुलाजवळ कत्तलीसाठी जाणाऱ्या दोन गोवंशांचे प्राण वाचविले होते, याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या खेड तालुक्यातील कडूस गावामध्ये कडूस गावचा माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्याच्यावर अनेक बड्या नेत्यांचे राजकीय वरदहस्त आहे, अशा शाबिर मुलानी ( इनामदार ) याच्या घरातून सुमारे साडेआठशे किलो पेक्षा जास्त गोवंश कापून तस्करी होत असल्याची बातमी मिळताच चाकण बजरंग दलाच्या गोरक्षक विभागाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून सदर प्रकार उधळून लावला आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्यामुळे संपूर्ण खेड तालुक्यामध्ये अतिशय तणावाचे वातावरण असताना दिनांक 01/07/2023 रोजी देखील खेड तालुक्यातील महाळुंगे गावाजवळ गोवंश तस्करी पकडली गेली असून , या तस्करी मध्ये खेड तालुक्यामध्ये असो किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असो, जागा जमिनी खरेदी विक्री व प्लॉटिंगच्या व्यवसायातील एका बड्या मुस्लिम गुंतवणूकदाराचे आरोपी म्हणून नाव समोर येत असल्याचे कळते.चाकण शहरातील हिंदुत्ववादी संघटना रोज गोरक्षणाचे कार्य करत असताना पोलिसांकडे रोजच अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत, परंतु असे प्रकार थांबतच नाहीत यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना वारंवार दुखावल्या जात आहेत असा आरोप चाकण शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना करत आहेत, आणि या संतापजनक प्रकाराच्या निषेधार्थ चाकण शहरातील सर्व व्यापारी बंधू व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी स्वयंस्फूर्तीने सोमवार दिनांक 03/07/2023 रोजी चाकण बंदचे आयोजन केले होते , तसेच दुपारी 03:00 वाजता चाकण शहरातून माणिक चौक ते महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण असा या घटनांचा निषेध करणारा मूक मोर्चा देखील निघाला होता. सर्व हिंदुत्ववादी संघटना व व्यापारी संघटनांकडून सदर मोर्चामध्ये चाकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. याचबरोबर सर्व संघटनांकडून सदर विषया बाबतचे निवेदन पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांना देण्यात आले तसेच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत मोर्चाची सांगता महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी करण्यात आली.