(प्रतिनिधी,अजय जगनाडे ) पवित्र आषाढी एकादशीच्या दिवशी खेड तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या कडूस या गावात झालेला झालेल्या गोमाता हत्येच्या निषेधार्थ समस्त चाकणकर ग्रामस्थ पंचक्रोशी च्या वतीने चाकण शहर बंद..!
दि.सोमवार दि ०३/०७/२०२३चाकण बंद व मूक मोर्चा च्या निमित्ताने आयोजकांकडून काही नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चाकण शहरातील सर्व व्यापारी व सर्व पोलीस यंत्रणा ही आपलेच बांधव आहेत त्यामुळे शक्य तितके त्यांना सहकार्य करावे.इतर कुठल्याही धर्मविरोधी किंवा व्यक्ती विरोधी प्रत्यक्ष नाव घेऊन कुठल्याही प्रकारचे घोषणा अथवा फलक झळकाऊ नये.आयोजकांबरोबर किंवा पोलिसांबरोबर कोणीही हुज्जत घालू नये.मोर्चाची सुरुवात माणिक चौका मधील हनुमान मंदिरासमोर सुवासिनींच्या हस्ते गोमातेचे पूजन करून होईल.मूक मोर्चा असल्याकारणाने कुठल्याही प्रकारच्या घोषणा मोर्चादरम्यान देऊ नये.मोर्चाला येताना आपल्या दंडावर काळी फीत बांधून यावी.सर्व धर्मबंधूंनी मोर्चाला येताना शक्यतो भगवी टोपी परिधान करावी.
आपत्कालीन आरोग्य व्यवस्था वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील, तरी सर्व नागरीकांनी शिस्तीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.तसेच समस्त चाकणकर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सर्व व्यापारी संघटना व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने दुपारी 3 वाजता चाकण एस टी स्टँड (माणिक चौक) ते महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण पर्यंत निषेध मूक मोर्चा काढण्यात येईल , तरी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सदर बाबत ची नोंद घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.