( न्यूज सोर्स ) राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. उद्धव ठाकरेही या मोर्चात सहभागी होणार आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षाचे कार्यकर्ते आणि मुंबईकरांना संबोधित करतील. या मोर्चासाठी पोलिसांनी तब्ब्ल 23 अटी ठेवल्या आहेत. त्यांचं पालन करणं ठाकरे गटासाठी बंधनकारक असणार आहे.
पोलिसांच्या महत्त्वाच्या अटीशर्ती पुढीलप्रमाणे १. मेट्रो सिनेमागृह ते मुंबई पालिका मार्गावरुन ठाकरे गटानं मोर्चा काढावा२. मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.३. नमुद आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत.४. मोर्चा / सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या समुदायाच्या धार्मीक / जातीय/ सामाजीक राजकीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे, देखाव्याचे, बॅनरचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, आक्षेपार्ह व अश्लिल गाणे अथवा वाद्य वाजविणे किंवा तत्सम प्रकार करता येणार नाहीत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी,५. मोर्चामध्ये बोलविलेल्या सर्व वाहनांना पोलीसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्यात. वाहनांनी शहरात प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे, मार्चामध्ये आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पाकीगसाठी निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सुचना द्याव्यात. मार्चासाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री महोदय यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असुन आयोजकांनी त्यांच्या मोर्च्याच्या तसेच सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरून परत जाण्याच्या वेळी कोणतीही रैली काढू नये.६. मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, लाठी, पुतळे इत्यादी बाळगु नये अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये. ७. सभेचे ठिकाणी पुरेशे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाणी महानगर पालीका यांचेशीसंपर्क साधुन अग्निशमन यंत्रणा व आवश्यक Portable Fire Extinguisher यंत्र राहतील याची दक्षता घ्यावी. ८. मोर्चा / सभेचे ठिकाणी रूग्णवाहीकेची व्यवस्था करावी. तसेच तात्पुरते वैदयकीय सेवा, वैदयकीय अधिकारी व आपात्कालीन व्यवस्थेचे आयोजन करावे.९. मोर्चा / सभेकरीता येणान्या जनसमुदायमध्ये महिलांचा देखिल समावेश राहणार आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत योग्यती खबरदारी घेऊन महिलांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी. १०. मोर्चा / सभेदरम्यान ध्वनीक्षेपणाचा आवाज मर्यादीत ठेवावा. मा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपणाबाबत दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालण करावे. ध्वनिप्रदूषण (नियम व नियंत्रण) अधिनीयम २००० अन्वये आवाजाची पातळी खालील नमुद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असु नये. सदर मर्यादेचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदुषण (नियम व नियंत्रण) अधिनीयम २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सदर गुन्हा शाबीती नंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अन्वये ०५ वर्षा पर्यंत केंद्र व रूपये १००००० रु. (एक लाख रूपये) दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतुद आहे. सभा कार्यक्रमात डिजे व बिम लाईटचा वापर करू नये,११. ध्वनीक्षेपकाची परवानगी ज्या ठिकाणाकरीता देण्यात आली आहे. त्याच ठिकाणाकरिता ध्वनीक्षेपणाचा वापर करण्यात यावा.१२. रूग्णालये, सरकारी दवाखाने, शाळा, कॉलेज अथवा कामाचे दिवशी सरकारी कचेऱ्याा / न्यायालये तसेच प्रतिबंधीत क्षेत्राजवळ ध्वनीक्षेपकाचे मयदिचे योग्य पालन करावे, १३. सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी मुंबई शहराच्याबाहेरून निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे यांचेकडे द्यावी.१४. मोर्चा / सभा स्थानाच्या कमाल मर्यादिपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करू नये, अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरले जाईल.१५. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवटा, दळणवळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. १६. सभेसाठी वापरण्यात येणारी विदयुत यंत्रणा, बेरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विदयुत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची ) व्यवस्था अगोदरच करावी. १७. मोर्चा / सभेचे ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या सुचनांचे, निर्देशांचे, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची आयोजकाने दक्षता घ्यावी.१८. मोर्चा दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.१९. सदर परवानगी पत्र कार्यक्रमाचे वेळी सोबत बाळगावे व कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी मागणी केल्यास . त्यांचे समक्ष सादर करावेत.२०. मोर्चा / सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी आयोजक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी,१४. मोर्चा / सभा स्थानाच्या कमाल मर्यादिपेक्षा जास्त लोकाना निमंत्रीत करु नये. अशा प्रकार क्षमतपक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरले जाईल.१५. सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडीकल, विजपुरवठा, पाणीपुरवटा, दळण-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. १६. सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बेरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थीतीत असल्याची खात्री करावी व विद्युत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची ) व्यवस्था अगोदरच करावी.१७. मोर्चा / सभेचे ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या सुचनांचे, निर्देशांचे, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्ननिर्माण होणार नाही याची आयोजकाने दक्षता घ्यावी. १८. मोर्चा दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.१९. सदर परवानगी पत्र कार्यक्रमाचे वेळी सोबत बाळगावे व कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी मागणी केल्यास त्यांचे समक्ष सादर करावेत. २०. मोर्चा / सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी आयोजक जबाबदार राहतील याचीनोंद घ्यावी.२१. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३) अन्वये अचानक उद्भवलेल्या व उद्भवनाऱ्या तात्कालीन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोर्चा / सभेस देण्यात आलेली परवानगी केव्हावी रद्द करण्याचा अधिकार, परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना राहील.२२. वरील सर्व अटी व शर्तीबाबत मोर्चा / सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची व सदर अटी व शर्तीचे तंतोतत पालन मोर्चामधील सर्वजण करतील याची जबाबदारी आयोजकांवर राहील. २३. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांनी संपूर्ण कालावधीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह अथवा भावना भडकवणारे वक्तव्य / घोषणाबाजी करू नये किंवा आक्षेपार्ह फलक प्रदर्शित करू नये ज्यामुळे उपद्रव निर्माण होईल.अशा अटी आणि शर्ती पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला दिल्या आहेत.