खेड परिसरातील कडुस या ठिकाणी पवित्र सण आषाढी एकादशी या दिवशी जाणीवपूर्वक हिंदूंचे पवित्र माते समान गाई ची कत्तल केल्याबाबत संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व मोका करण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खेड तालुका वतीने खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. प्रतीपंढरपुर कडुस या गावी आपला पवित्र सण आषाढी एकादशी या दिवशी जाणीवपुर्वक ज्या गाईला हिंदू देवता मानतात,त्या गाईंची कत्तल करून सर्व सामान्य माणसाच्या भावना दुखावण्याचे काम समाजकंटकांनी केलेला आहे असे कृत्य करून समाजातील धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम झालेलं आहे.हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत सदर व्यक्तीच्या पार्श्वभूमी बाबत माहिती घेऊन त्यावर हत्याबंदी कायद्यान्वये कारवाई करून मोक्याची देखील कारवाई करावी त्वरीत करण्यात यावी यासाठी निवेदन दिले.सर्वांत कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे,युवासेना तालुकाप्रमुख मृण्मय बाबाजी काळे,शहरप्रमुख पप्पुशेठ राक्षे,उपविभागप्रमुख राहुल मलघे,युवासेना उपतालुकाप्रमुख अजिंक्य गाडे,ज्येष्ठ नेते अशोक वाळुंज,शिवसैनिक संजय कोकणे,भानुदास येळवंडे आदि शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, पाईट व्यापारी असोसिएशनने कडूस येथे झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत एक दिवसीय बंद पाळण्याचे आव्हान केले आहे.