बातमी 24तास
(न्यूज ब्युरो ) श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची ही महाराष्ट्र राज्याची पुण्यभूमी आहे. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला.त्या अनुषंगाने आळंदीतील ग्रामस्थ आणि दक्षता कमिटी यांचे सहयोगाने आळंदी पोलीस स्टेशन येथे बैठक बोलवण्यात आली होती. आळंदी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने सुलतान भाई शेख यांनी भूमिका मांडली तर आरिफ भाई शेख यांनी मुस्लिम समाजाचे आळंदीत वर्षानुवर्षाची परंपरा आणि मुळात कुरबानी होत नाही, याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.यामध्ये आळंदीत मुळात कुर्बानी होत नाही आणि ही वंशपरंपरा आमची पिढी पुढे चालू ठेवणार आहे. सर्व मुस्लिम समाजही त्यासाठी अनुकूल रहावा अशी आशा व्यक्त केली. आळंदी पोलीस स्टेशन येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे नव्याने रुजू झालेले उपायुक्त श्री गौर यांच्या विशेष प्रमुख उपस्थितीत सदर बैठक आळंदी पोलीस ठाण्याचे ए.पी. आय. सुनील गोडसे यांनी बोलवली होती.यामध्ये दक्षता कमिटीचे डी.डी.भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे पाटील,शिवसेना नेते उत्तम गोगावले.भारतीय जनता पार्टीचे संजय घुंडरे आणि मुस्लिम बांधव आळंदीकर ग्रामस्थ म्हणून उपस्थित होते.
श्री तीर्थक्षेत्र आळंदी हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव असे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी बकरी ईद ची कुर्बानी होत नाही. फक्त धार्मिक विधी होतो. श्री तीर्थक्षेत्र आळंदी मधील जुन्या पिढीतील एका मुस्लिम मित्रांनी आपल्या मराठी मित्राला दिलेल वचन आजही पाळले जात आहे. स्वतःच्या धार्मिक आस्था जरी असल्या,तरी माऊलींच्या आळंदीचे पुण्य राखले जाव यासाठी वर्षानुवर्ष जुन्या पिढ्यातील मुस्लिम कुटुंबाने ही प्रथा चालू ठेवली.आता नव्याने आळंदीत स्थायिक झालेल्या इतर कुटुंबाने ती परंपरा पुढे चालू ठेवावे यासाठी प्रयत्नशील राहत असताना त्यात आता यश आलेले दिसत आहे.आणि आळंदीमध्ये कुठल्याही प्रकारची कुर्बानी होत नाही हे पुन्हा अधोरेखित केले गेले आहे.
आषाढी एकादशीच्या हिंदू बांधवांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील गोडसे यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्त आळंदी मशिद येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.आणि मुस्लिम समाजाचे परंपरा जोपासली असल्याबद्दल आभारही मानले आहेत.या मुस्लिम बांधवांच्या मीटिंगसाठी ॲड नाजीम शेख.ॲड सोहेल शेख. सुलतान शेख. आरिफभाई शेख.एजाज तांबोळी. आय्याज इनामदार.निसार सय्यद. पत्रकार एम.डी. पाखरे. पत्रकार अर्जुन मेदनकर आणि बाहेरून स्थायीक झालेले आळंदी मुस्लिम नागरिक उपस्थित होते.
*🟥टाटा स्काय ची धमाकेदार ऑफर ; लगेच फायदा घ्या फक्त 1500 रु मध्ये बसवा कनेक्शन आणि महिना भर मोफत*🟥 *ज्याच्याकडे टाटा प्ले आहे आणि त्याला त्याचा पॅक चेंज करायचा आहे तर मला कॉल करा 318 मध्ये सगळे चैनल ( एचडी चॅनल) पाहायला मिळतील मला कॉल करा आणि तुमचा टाटा प्ले चा पॅकेज चेंज करून घ्या**📞अधिक माहितीसाठी आताच सम्पर्क करा:**📱9420159059**📱8796164028*…