पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे विनय कुमार चौबे यांच्या आदेशाने, रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ पर्यंत सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व स्तरातील कर्मचारी यांची पायी गस्त ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस, ट्राफिक पोलीस, शिपाई,कर्मचारी, असे जवळजवळ 15 ते 20 जणांचा स्टाफ हा रोज आळंदीमध्ये सायंकाळची गस्त पायी जात घालत असतात. यावेळी कायदा मोडणाऱ्या काही घटना आढळल्यास त्यावर त्वरित धडक कारवाई करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथून स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेले आहेत. आज आळंदी शहरांमधील रस्त्यांवर गस्त चालू असताना आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना प्रदक्षिणा मार्ग आणि अंतर्गत मार्गावर अस्ताव्यस्त वहाने लावल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याचे दिसून आले.यावेळी त्यांनी वाहतूक पोलिसांना आदेश देत सर्वच्या सर्व दोन चाकी,चार चाकी, वाहनावर ज्यांच्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे अशा वाहनांवर दंडात्मक चलनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सुमारे एकाच ठिकाणी जवळजवळ 50 ते 60 दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर कारवाई आज आळंदी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. आळंदी वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आळंदी अंतर्गत रस्ते. प्रदक्षिणामार्गातील चौक. मार्ग प्रमाणे. इतर अंतर्गत रस्त्यांवरही अडथळा करणाऱ्या वाहनांवर चलनात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.