बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र; या शहरांवर नजर ठेवण्याचे दिले आदेश

Share This News

(बातमी 24तास वृत्त संस्था ) बकरी ईदनिमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून पोलीस महासंचालकांना महत्त्वाच्या सूचना देत पत्र पाठवलं आहे. बकरी ईदनिमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. गोवंश हत्या बंदी कायदा उल्लंघनाच्या तक्रारी आल्याचंही या पत्रामध्ये म्हटलं आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. गोवंश हत्या बंदी कायदा उल्लंघनाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे बकरी ईद निमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मालेगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काटेकोर अंमलबजावणी करावी असं नार्वेकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे दरम्यान लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून यंदा पहिल्यांदाच विधानभवनात योग दिन साजरा करण्यात येणार असून याबाबत राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे. आपण 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. भारतात आणि भारताबाहेर योग प्रेमी आहेत. आम्ही यंदा पहिल्यांदाच विधानभवनात योगदिन साजरा करणार आहोत. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy