(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) आळंदी मध्ये सुमारे पाच दिवसापासून पाणी नाही याचा वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. पहाटे भामटखेड वरून आळंदी साठी पाणी सोडण्यात आलेले आहे सदर पाणी आळंदीमध्ये सुमारे बारा साडेबाराच्या दरम्यान दाखले झाले आहेत परंतु सदर पाण्याला कमी दाबाने होत असलेला पुरवठा त्यामुळे आळंदी नगरपरिषद वाटरवर्सरी पाणी टाकी भरण्यास विलंब होत आहे पर्यायाने कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे मोटर सप्लाय चालू होणे आणि गावातील टाक्या भरणे याचे विलंब लागणार आहे. सुमारे पाच ते सहा तासाचा कालावधी यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाण्याचा फुल सुरू असून आळंदी ते पाणी पोहोचला आहे परंतु पाण्याचा दाब वाढल्याशिवाय आळंदी परिसरात पाणी वितरित करणे अवघड असल्याचे आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात येत आहे आळंदीत पाणी हे 100% संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिळेल याची खात्री आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठ्याच्या कडून देण्यात येत आहे नागरिकांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आळंदी नगर परिषदेने आभार व्यक्त केले असून सहा ते सात वाजेपर्यंत आज संध्याकाळी शंभर टक्के पाणीपुरवठा होईल नागरिकांनी याची नोंद घेत नगरपरिषदेला सहकार्य करावे असे पाणीपुरवठा विभाग आळंदी नगरपरिषद यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.