आळंदी मध्ये माऊलींच्या प्रस्थान च्या वेळी घडलेली ती घटना अर्धवट स्वरूपात असल्याचे आता समोर येत आहे मुळात मर्यादित प्रवेश याबाबत धोरण ठरलेलं होते तरीही ढोक महाराजांच्या संस्थेचे काही विद्यार्थी आम्हालाही पास हवेत आणि आम्ही दर गुरुवारी माऊलींचे खांदेकरी आहोत असे म्हणत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त एडवोकेट विकास ढगे यांच्याकडे आग्रह धरल्याचे दिसून येत आहे. त्याबाबतही समजावून सांगण्यासाठी माऊलींचे पालखी सोहळा चोपदार राजाभाऊ आणि प्रमुख विश्वस्त एडवोकेट विकास ढगे हे समजावून सांगत आहेत तरीही वारकरी मात्र ऐकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती तरी नंतर प्रमुख विश्वस्त यांनी आपण यादी दिल्यास पंचवीस पाच देण्याची व्यवस्था करतो आपण सर्वांमध्ये खांदेकरांची यादी द्यावी अशी ही विनंती केली की दिसून येत आहे मात्र वारकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे मनस्थिती त्याबाबत न दाखवता रेटारिटी करत अक्षरशा पोलिसांच्या अंगावर जात त्यांना तुडवत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जे आवश्यक होतं ते करणे भाग पाडल्याचे दिसत आहे मुळात या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात एकच क्लिप व्हायरल झाली आणि इतर वस्तूस्थिती ही जनतेसमोर न आल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे मुळात मर्यादित प्रवेश ही चेंगराचेंगरी न होण्यासाठी गरज होती त्यासाठी पोलीस प्रशासन विश्वस्त मंडळी यांना सहकार्य करण्याची अपेक्षा वारंवार बोलून दाखवल्याचे माहिती आता समोर येत आहे. दरम्यान यामध्ये स्थानिक ग्रामस्थ युवकांनी कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे याबाबत पुढे आणखीन खरी माहिती अजून समोरील याबाबत आशा आहे.