बातमी 24तास (वृत्त सेवा) सालाबादप्रमाणे याही वर्षी कलाविष्कार मंच चाकण, मानस मैत्री फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण यांच्या माध्यमातून यावर्षी ‘भव्य किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील शेकडो मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक हर्षदा विलास पवार, द्वितीय विराज योगेश साखरे, सावी विकास मळूक आणि तृतीय वंश नितीन केदारी , आशुतोष केळकर आणि उत्तेजनार्थ 12 बक्षिसे देण्यात आली तसेच कलाविष्कर मंच चाकण यांच्या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या वेळी कलाविष्कार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कलाविष्कार मंचचे अध्यक्ष विशाल बारवकर, मनिषाताई गोरे, करपे सर, रत्नेश शेवकरी,रमा हुलावळे, प्रमिला गोरे, डॉ.भवारी, गोरखनाथ कांडगे, बोरकर सर, धीरज बिरदवडे उपस्थित होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे संचालक नितिनभाऊ गोरे, मूलचंद मिल्स, शाम राक्षे, अनिल भुजबळ, नगरसेवक महेश शेवकरी, विशाल नायकवाडी यांचे विशेष सहकार्य मिळाले अशी माहिती मनोहर बापू शेवकरी यांनी दिली.