बातमी 24तास(वृत्त सेवा) खेडची विधानसभेची जागा जिंकून आम्हांला हिशोब चुकता करायचा,दुनिया इकडची तिकडे झाली तरी पण खेड चा आमदार हा शिवसेनेचाच होईल असा दृढ विश्वास शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चाकण येथील सांगता सभेत बोलताना व्यक्त केला.खेड आळंदी विधानसभा महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेव्हा जेव्हा चाकण मार्केट यार्ड मध्ये उमेदवारासाठी ची प्रचार सभा होते ती जागा शंभर टक्के शिवसेनाच जिंकते या वेळेसही ही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून मागचा हिशोब चुकता करणार आहे. यासाठी महा विकास आघाडीच्या सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले आहेत. आणि विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे,चाकण midc ही शरद पवारांची कृपा आहे.आज महाराष्ट्रातील उद्योग व रोजगार हे गुजरातला घेवून जात आहेत.
महाराष्ट्र व मराठी माणसाला भिकारी बनवण्याचे काम सुरू आहे.खेड चा आमदार हा गुंड आहे ,असा माणूस विधानसभामध्ये असणे हे लाज वाटणे गरजेचे आहे.असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला. येथील खेडची जागेबाबत शरद पवारांना सांगितले की, ही जागा आम्हाला द्या, आम्हाला हिशोब चुकता करायचा आहे. लाडक्या बहीण योजनेवर टीका करताना सांगितले की,ह्यांना 1500/- रु देवून गुलाम बनविले आहे.त्यांना रोजगार द्या.आम्ही महालक्ष्मी योजना आणून 3000/- रु देणार आहे. तसेच महिलांना महाराष्ट्राभर एस टी मोफत 25 लाखाचा आरोग्य विमाशेतीसाठी वीज मोफत 4000 रु बेरोजगार लोकांना ,नोकरी मिळेपर्यत त्याला भत्ता मिळत राहणार आहे.महायुतीवाले विकासावर बोलत नाहीत, हिंदू मुस्लिम वर बोलतात.राज्याची निवडणूक आहे,येथील प्रश्नावर बोलत नाहीत, हे लोक पाकिस्तानवर झेंडा लावण्याची भाषा करतात.यांची नवीन घोषणा आहे,बटेंगे तो कटेंगे,यांचे लोकसभा निवडणुकीत सर्व लोकांना तुमचे सर्व काटले आहे. हशा टाळ्या आपण.सर्व मराठी माणूस एक आहोत.सेफ आहोत असेही सांगितले.हे राज्य उध्वस्त करण्याचे काम हे गुजरातचे दोन व्यापारी मोदी व शहा करत आहेत.त्यांना योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यातील देवमाणूस पाहिला.शरद पवार हे आमचे बाळासाहेब ठाकरे यांच्या समान आहेत.ते आमचे नेते आहेत.त्यांच्यावर आलेल्या वेळेचा आम्हाला बदला घ्यायचा आहे.