वादळी वारा पावसाने झाडे उन्मळून पडली. रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू –आळंदी मुख्याधिकारी कैलास केंद्रे
बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरीफभाई शेख)वादळी वाऱ्याने सुरू झालेल्या पावसाने आळंदीला आज पुन्हा झोडपून काढले. रस्त्यावर तुडुंब भरलेला पाणी याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला तसेच आळंदीतील वडगाव रोड येथे तीन झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून रस्त्यावर पडली त्यामुळे वडगाव रोड येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी पाठवून जेसीपीच्या साह्याने ही झाडे रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्र यांनी दिली. मुसळधार पावसाची सलग सुरुवात त्याचबरोबर आजच्या पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली राहून राहून गारा पडत होत्या त्याचबरोबर सोसाट्याचा वार आहे वाहताना पाहायला मिळाला रस्त्यावर साचलेले गुडघा एवढे पाणी त्यामुळे चार चाकी दोन चाकी वाहनचालक अक्षरशः तारेवरची कसरत करत वाहने काढत होती दरम्यान वडगाव रोड येथे तीन झाडे ऊन म्हणून पडले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना मिळतात त्यांनी तात्काळ त्यावर कारवाई करत जेसीबीच्या साह्याने सदर रस्त्यातील अडथळा दूर करण्याचे कामास सुरुवात केली आहे