बातमी 24तास, (प्रतिनिधी) शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षाच्या वतीने खेड तालुक्यात गाव तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यादृष्टीने खेड तालुक्यात गावोगावी शाखा उघडण्याचे काम शिवसेना खेड तालुकाच्या वतीने सुरु आहे. त्या उपक्रमाची सुरुवात शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र येलवाडी येथे करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ अहिर उपस्थित होते. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या येलवाडी गावच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले व उपसभापती व शिवसेना नेते अमोल पवार यांच्या वतीने येलवाडी गावातील जवळपास ३०० ज्येष्ठ व्यक्तींचा फेटा बांधून, सन्मानपत्र व भेटवस्तू स्वरुपात छत्री देऊन सन्मान करण्यात आला. येलवाडी गावच्या वतीने सचिन अहिर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सचिन अहिर यांनी “उदघाटन शाखेचे, आशिर्वाद ज्येष्ठांचे” या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच शिवसेना वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत,ज्यांनी पक्षाच्या वाईट काळात पक्षात प्रवेश केला, पक्षाला ताकद दिली, उध्दवसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले अश्या कार्यकर्त्यांना भविष्यात संधी दिली जाईल असे सांगितले. यावेळी अमोल पवार यांनी मनोगत व्यक्त करताना येलवाडी गावचा इतिहास व गावातील शिवसेनेची ताकद, विकासकामे याबद्दल माहिती दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, अशोकराव खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, महिला सह संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे महिला जिल्हा संघटिका पुनम पोतले, तालुका महिला संघटिका उर्मिला ताई सांडभोर,जि. प. सदस्य बाबाजी काळे, उपतालुकाप्रमुख संजय घनवट, मंगेश प-हाड , संतोष शिळवणे, गणेश नाणेकर, चेतन आबा बोत्रे, तानाजी देवकर, तानाजी गाडे, जीवन बोत्रे , प्रवीण गाडे, अतुल गाडे, अमित बवले, वेदांत गाडे मयूर बोत्रे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार गाडे यांनी केले, स्वागत महाराज अशोक गाडे यांनी केले तर आभार जीवन बोत्रे यांनी मानले.