बातमी24तास
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचीयाता आहेत , यंदाचे सुरू असणारे वर्ष २०२४ – २५ हे त्यांच्या जन्माचे ७५० वर्ष म्हणुन साजरे होत आहे .श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवसप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष(७५०) २०२४-२५ बोधचिन्ह अनावरण सोहळा शुभहस्ते – महामहीम श्री.सी.पी.राधाकृष्णन् ( राज्यपाल – महाराष्ट्र राज्य) यांचे शुभ हस्ते राजभवन , मुंबई.येथेआज दिनांक १२ /९/ २०२४ रोजी सायं ७ वाजता संपन्न झाला तसेच प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची चे प्रमुख विश्वस्त – ॲड श्री राजेंद्र उमाप श्री योगी निरंजन नाथ – पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त श्री ज्ञानेश्वर वीर – व्यवस्थापक श्री .उमेश बागडे – प्रसिध्दी प्रमुख उपस्थित होते .महामहीम श्री राज्यपाल महोदय यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त केली व लवकरच संजीवन समाधी दर्शनास येण्याचे सांगितले . प्रमुख विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप व पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती राज्यपाल यांना दिली.