बातमी24तास
(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) निर्मळ आणि प्रेमळ नातं याला कशाची जोड नसते. भावना आणि विश्वास देवालाही सर्वस्व परत द्यायला भाग पाडतात. असाच एक प्रसंग घडला आळंदीच्या इंद्रायणी तीरावर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी कृत्रिम तलावाची विसर्जनासाठी सोय केलेली आहे. गणपतीचा विसर्जनाचा आजचा पाचवा दिवस त्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून गणेश मूर्ती संकलनासाठी नगरपरिषदेच्या कृत्रिम तलाव केंद्रावर आल्या. श्रीगणेशाची आरती झाली,पूजन झाले,आणि माझा बाप्पा, माझा गणपती म्हणून या एका चिमुकल्याने रडायला सुरवात केली . आरती करत असताना विरहाचे भाव त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर बिनचूक दिसत होते. माझा गणपती, माझा बाप्पा, म्हणत या चिमुकल्याने अक्षरशः मोठ्याने रडायला सुरुवात केली . आणि आजूबाजूला असणाऱ्या अनेकांची मने हेलावली.हे दृश्य पाहत असताना भावनिक झालेल्या आळंदी नगरपरिषद अग्निशामक दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी आपल्या मोबाईल मध्ये हे क्षण टिपले. सोशल मीडियावर व्हायरल ही केले.
गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना बऱ्याच तरुण मंडळांच्या गणेश भक्तांच्या भावना मनाला भावूक करून स्पर्श करून जात असतात. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…असा जयघोष करताना अक्षरशः मन भरून येत असते . एका कुटुंबातील गणेश विसर्जन साठी आलेल्या या चिमुकल्याच्या गणराया आणि भक्ताच्या मनमोहक नात्याने प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फोडला. ज्या अधिकार आणि भक्ती भावाने संत तुकोबारायांच्या धर्मपत्नी विठुरायाला शिव्या देत होत्या. त्यात भक्ती भाव ही होता. आणि विठू माऊलीला तो आवडतही होता. तसाच प्रकार मात्र या चिमुकल्याच्या हाताने घडताना दिसला. बाप्पा, माझा गणपती.असं म्हणत या चिमुकल्याने अक्षरशः फुले,आरतीचा ताट. सजावट याचा विचार न करता ऐन विसर्जनाच्या वेळी गणरायाला मिठी मारण्यासाठी आतुर होताना. त्याच्या वडिलांनाही तो आवरता आवरत नसल्याचे चित्र दिसून आले. गणपती बाप्पा आणि भक्त हे नातं, हे प्रेम, पाहून अक्षरशा मन हादरून गेले.आणि बाप्पा मोरया म्हणत भावनाही दाटून आल्या. हे दृश्य टिपलं आळंदी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रसाद बोराटे यांनी. निस्सीम भक्तीचा आणि गणराया प्रती असलेल्या श्रध्येचा हा अनुभव आळंदीच्या इंद्रायणी तीरावर.आळंदी नगर परिषदेने स्थापन केलेल्या, कृत्रिम तलाव मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी पहावयास मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.