बातमी 24तास
प्रतिनिधी:अभिजीत सोनावळे:
चाकण शहरात गणेश उत्सवानिमित्त नेहमीच सामाजिक विषयावर भाष्य करणारे विविध विषय हाताळून जिवंत देखावा सादर करून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या चाकण शहरातील नवयुग मित्र मंडळाने ६१ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत सध्याच्या परिस्थितीवर आधारित “गुड टच” “बॅड टच” हा समाजातील सद्य स्थितीवर आधारित हा जिवंत देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी चाकण शहरात महिला,पुरुष,अबालवृद्ध गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.चाकण शहरात नवयुग मित्र मंडळ हे जिवंत देखावे सादर करण्यासाठी चाकण पंचक्रोशीत पहिले गणेशोत्सव मंडळ आहे. जिवंत देखाव्याच्या या वाढत्या ट्रेंडमुळे नोकरदार वर्ग, गृहिणी, व्यवसाय या क्षेत्रासह शाळा, महाविद्यालयी युवक, युवती या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. असे नवयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वाव्हळ,सम्राट अशोक राऊत, रोहन धाडगे, उमेश राऊत, अतुल कदम, अजय राऊत,मंगेश कांडगे,सौरभ पवार, अभिजीत राऊत,अनिल जाधव, संदीप राऊत, निखिल राऊत, अजय पाटील, अभय पाटील, सुयोग कवडे, अजय जगनाडे, मयूर साळुंके, विशाल ढेंबे, वैभव ढेंबे, भूषण कदम, तेजस राऊत,प्रशांत राऊत, कल्पेश भोई यांनी सांगितले. चाकण नगरपरिषद व राष्ट्रीय सेवा दल आयोजित गणेशोत्सव स्पर्धा सन २०२३ मध्ये या मंडळाने “कोयत्याने कापीन” हा देखावा सादर केला होता. मंडळाच्या या जिवंत देखाव्यांना गणेश भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे उमेश राऊत यांनी सांगितले.
चाकण शहरात यंदा ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व जिवंत देखाव्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भर दिला आहे.