

बातमी 24तास(वृत्त सेवा )
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज चाकण येथील मेदनकरवाडी येथे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीची बैठक संपन्न झाली.
यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ. पूनम पोतले यांनी मार्गदर्शन केले. महिलांना स्वसंरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण चालू करून दिले तसेच लहान मुलांना बालसंस्कार वर्ग चालू करून दिले. बचत गटांची माहिती, आरोग्य, शासकीय सोयी-सुविधा, संघटन, महिलांची सुरक्षितता यावर चर्चा करण्यात आली. महिलांनी देखील प्रेरित होऊन यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षामध्ये सक्रिय सहभागी होऊन सौ. पूनमताई पोतले यांच्यासोबत समाजकार्यात काम करणार असल्याचे सांगितले.