बातमी24तास (प्रतिनिधी आरिफभाई शेख) सुमारे चार दिवसांपूर्वी आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये पोलीस शिपाई असलेल्या अनुष्का केदार यांनी गरुड खांब येथील जागेवरून नदी मध्यें उडी मारून आत्महत्या केली,ही गोष्ट ताजी असतानाच काल दिनांक 29 रोजी गुरुवारी सुमारे सकाळी सात ते आठच्या दरम्यान स्कायवाक वरून एका 20 ते 25 वर्षीय तरुणीने उडी घेतली ची माहिती समोर आली आहे, यामुळे आळंदी प्रशासन मात्र कमालीचे अस्वस्थ आहे. मुळातच आळंदी पोलीस स्टेशन यांना आळंदीतील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वस्तीचा आणि रहदारीचा त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद यांना आळंदीतील सोयी सुविधांचा प्रचंड ताण असताना, गणेश उत्सव तोंडावर असताना. अशा घटनांमुळे मात्र सतर्क राहावे लागत आहे. दरम्यान तरुणीने उडी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.नामांकित वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली, त्यानंतर आळंदी अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सचिन गायकवाड यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे तसेच आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतील अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी यांचे मार्फत मोठ्या प्रमाणात शोधकार्य चालू केले. मात्र सततच्या पावसाने आळंदी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी दुधडी भरून वाहत आहे.त्याचाच परिणाम शोधकार्य घेण्यावर होत आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये दिवसभरात कालपासून आळंदी चऱ्होली धानोरे पर्यंत शोधकार्य करण्यात आले, मात्र हाती काही लागलेले नाही.अशीच परिस्थिती राहिली तर आळंदीतील नदीकिनारी हॉटस्पॉट म्हणून सतर्क राहावे लागेल.आणि ही बाब मात्र नक्कीच दुदैवी असेल.चार दिवसात दुसरी घटना होणे ही खूप दुर्दैवाची बाब म्हणायला हवी. त्याचबरोबर दक्षता घेत या घटनेबाबत सतर्कता पाळली जात आहे. दरम्यान आळंदी नगरपरिषद मार्फत शोध कार्य उद्याही चालू राहणार असो त्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनची मदत घेतली जाणार असल्याची माहिती आहे.