बातमी 24तास, (वृत्त सेवा )
चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच रोटरी क्लब चाकण या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मंडळाचे अध्यक्ष,शांतता कमिटी व पोलीस पाटील यांची उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत मंडळाच्या अडचणी जाणून घेऊन खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. गणेशत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या मंडपाचा आकार लांबी 10 फूट, रुंदी 10 फुट एवढा असावा मंडपाचा आकार रस्त्याच्या रुंदीचे एक तृतीयांश पेक्षा जास्त होणार नाही. याची दक्षता घ्यावी, मंडपाचे स्टेज मजबूत असावे प्रमाणपत्र मंडवाले यांच्याकडून लिहून घ्यावे मंडपामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करावी, मंडपामध्ये जनरेटरची सोय तसेच बॅटरी गॅसबती उपलब्ध ठेवावी, वादग्रस्त देखावे कार्यक्रम करणे टाळावे कार्यक्रमाची रूपरेषा पोलीस स्टेशनला जमा करावी ध्वनीक्षेपकाचे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे,मंडपामध्ये अथवा इतरत्र अनोळखी संशयित बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ कळवावे, खिसे कापू पासून सावध रहा, अफवा पसरवू नका, स्त्रियांनी आपले दागिने सांभाळावेत, मुलांना एकटे सोडू नका, आपले वाहन योग्य ठिकाणी पार्क करा, वाहनात मौल्यवान वस्तू ठेवू नका, याबाबत सूचना फलक लावावे मंडप मुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी साथी मंडळाचे स्वयंसेवक नेमावे. मंडळांनी गणेशोत्सव काळात स्वतःचे एम एस सी बी कडून टेम्पररी मीटर घ्यावे. मंडळाचा देखावा आक्षेपार्ह नसावा. महिलांच्या सुरक्षेबाबतच्या देखाव्यांना प्राधान्य द्यावे. महिलांची व पुरुषांची दर्शन रांग वेगवेगळी ठेवावी. सर्व गणेशोत्सव मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत,एक गाव एक गणपती संकल्पनेचे आयोजन करावे गणपतीच्या मूर्ती जवळ 24 तास स्वयंसेवक नेमावेत. पत्ते खेळणे दारू पिणे यासारखे प्रकार करू नये. गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर हार व इतर निर्माल्य भामा नदीत फेकू नये. नगरपालिकेने तयार केलेल्या मूर्ती संकलन केंद्र येथे मुर्त्या जमा कराव्या. किंवा विसर्जन घाटावरती विसर्जन करावे भाविकांनी दिलेली वर्गणी इच्छेने घ्यावी बळजबरी करू नये. मिरवणुकीच्या दिवशी दारू पिऊन नाचू नये.
यावेळी पोनि गुन्हे नाथा घार्गे ,सपोनि गणपत धायगुडे,सपोनि चौरे वाहतूक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते जनसमुदाय 60 ते 70 उपस्थित होते.