बातमी24तास ( वृत्त सेवा)
मी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय कायद्यात दुरुस्ती केली ती त्यावेळची ग्रामीण भागातली परिस्थिती बघून केली. आजही माझे स्वतःचे मेडिकल कॉलेज असल्याने मला अनेक अडचणीची कल्पना आहे.तरीही डॉक्टरांनी समाजप्रती विचारपूर्वक योगदान दिले पाहीजे. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग चे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.
वैद्यकीय व्यवसायातील येणाऱ्या विविध कायदेशीर अडचणी संदर्भात आणि या व्यवसायाशी संबंधित सर्व कायदेविषयक बाबींचा विचार विनिमय करण्याकरिता चाकण डॉक्टर्स असोसिएशन च्या वतीने राजरत्न हॉटेल वाकी येथे एकदिवसीय कार्यशाळा लेगकॉन आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी खेड आळंदी चे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील तसेच मोशी आळंदी परिसरातील सुमारे ४०० हून अधिक प्रसिद्ध डॉक्टर्स उपस्थित होते.
ही कार्यशाळा एकूण ९ सत्रात पार पडली. या करिता डॉ. ऍड . ज्योती भाकरे डॉ एड अंजली दुधगावकर, डॉ. ऍड . मिलिंद सोनवणे, डॉ दिलीप वाळके डॉ. ऍड . मंदार रानडे, डॉ अरुण मिश्रा, ऍड . अमित कारखानीस, ऍड.मकरंद आडकर आदि मान्यवरानी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी खेड आळंदी चे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील उपस्थित होते.चाकण डॉक्टर असोसीएशन चे अध्यक्ष डॉ. असित आरगडे हे न्यायवैद्यक विषयातले तज्ज्ञ असून त्यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सर्व वैद्यकीय व्यवसायिकांनी आपल्या अडचणी सोडविण्याकरिता एकत्र येऊन सरकारला मागण्या केल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कायदे विषयक अडचणी सोडविण्याकरिता आम्ही प्रतिबद्ध आहोत. या करिता डॉ. असित आरगडे, डॉ मंदार रानडे, डॉ मिलिंद कुलकर्णी ही मंडळी पाठपुरावा करण्यात अत्यंत तरबेज आहेत असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.”यावेळी बोलताना आमदार दिलीप मोहिते म्हणाले की तालुक्यात विविध शाखाचे आणि तज्ज्ञतेचे विविध डॉक्टर्स तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सांभाळतात. त्यांच्या अडीअडचणीना मी कायमच मदत करत आलो आणि राज्य सरकार कडे जे विषय असतील त्या संदर्भात मी इथून पुढे देखील मदत करत राहीन.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात संपूर्ण चाकण डॉक्टर्स असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेषतः डॉ विक्रम शेवाळे, डॉ अमोल बेनके, डॉ सागर पाटील, डॉ सागर सोमवंशी, डॉ प्रशांत शेलार, डॉ तुषार गोरे आदिनी विशेष योगदान दिले. इतक्या विविध तज्ज्ञांची एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची या तालुक्यातील ही पहिलीच वेळ असून त्याकरिता मी आपले अभिनंदन करतो असे मत अस्तित्व परिषदेचे संस्थापक डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुप्रिया भाटकर आणि डॉ शार्दूल पंचवाडकर यांनी केले तर आभार डॉ देविराज पाटील यांनी व्यक्त केले.