बातमी24तास(प्रतिनिधी आरिफ भाई शेख)
आळंदीतील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या गरुड खांबा वरून उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाई अनुष्का पवार यांच्या मृत्यूचे गुढ कायम आहे. रविवार दिनांक 25 8 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता इंद्रायणी नदीवरील गरुड खांब येथे येथून उडी मारून पोलीस शिपाई अनुष्का यांनी आत्महत्या केली त्यांचा मृतदेह अजूनही आढळून आलेले नाही.आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई अनुष्का या दोन दिवस कामावर रुजू झाले नव्हते पुणे ग्रामीण पोलीस येथे कामावर रुजू असलेले पोलीस शिपाई अनुष्का सुहास केदार वय 20 रा लक्ष्मीनारायण नगर दिघी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन केला होता अशी माहिती मिळत आहे.परंतु शोधकार्य चालू असू नये अध्यापही मृतदेह हाती लागलेला नाही सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे शोध कार्याला पाण्याच्या प्रवाहामुळे अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान आळंदी पोलीस स्टेशन आळंदी नगरपरिषद तसेच यांची मार्फत मोठ्या प्रमाणात शोधकार्य सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोलेगाव पर्यंत असणाऱ्या नदीच्या प्रवाहात मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू असून गोलेगाव नंतर पुणे ग्रामीण पोलिसांची हत्या सुरू होत आहे त्यासाठी सदर मृतदेह शोधण्याच्या बाबतची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय यांना कळवण्यात आली आहे दरम्यान रविवारी सायंकाळी पाच वाजता आत्महत्या केलेल्या पोलीस शिपाई यांची त्वरित शोधकारी सुरू करून मृतदेह शोधण्याच्या कार्याला सुरुवात झाली होती मात्र अंधार झाल्यानंतर सदरचे कार्य सकाळी लवकर सुरू करण्यात आल्याची माहिती आळंदी मुख्याधिकारी कैलास केद्रे त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिले आहे आत्महत्या करण्यापूर्वी महिला पोलीस शिपाई अनुष्का यांनी आपल्या मित्राला इंद्रायणी नदीत उडी मारत असल्याची माहिती दिली होती. सदर मित्राला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले असून,कसून चौकशी केली जात आहे पुढील तपास आळंदी पोलीस स्टेशन मार्फत केला जात असून मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे.