बातमी24तास(प्रतिनिधी,आरिफ भाई शेख)
पुणे येथे शुभारंभ कार्यालयामध्ये राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विठ्ठल आबा मोरे यांनी वारकरी संप्रदायातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्रित करून वारकरी संमेलनाचे आयोजन केले. या माध्यमातून विविध मान्यवरांचे आचार विचार प्रदान होणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. या माध्यमातून थोर विचारवंत साहित्यिक डॉक्टर रफिक सय्यद पारनेरकर, डॉक्टर श्रीरंग गायकवाड पुणे तसेच ह भ प फरताळे महाराज यांचे वारकरी संप्रदायातील अनुभव संवाद आयोजित करण्यात आले होते. ह भ प संजय महाराज जाधव तसेच बापूसाहेब देहूकर यांच्यात मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय या कार्यालयामधील संमेलनासाठी उपस्थित होता. या राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी संमेलनाची समाप्ती माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.