बदलापुरातील अजाण बालिकांवरील अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी
बातमी 24तास, मुंबई वृत्त सेवा – बदलापुरात अजाण बालिकांवरील झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत वाईट माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषीना कठोरात कठोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे आहेत मात्र केवळ कठोर कायदा करून प्रश्न सुटणार नाही कठोर कायदा असायला हवाच त्यासोबत सरकारने ही दक्ष राहिले पाहिजे आणि समाजानेही महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे जागृत राहिले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले. बदलापुरातील बालिका वरील अत्याचाराचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. कोलकाता येथे एका महिला डॉक्टर वर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. उरण येथे नुकतीच यशश्री शिंदे या युवतीची हत्या करण्यात आली महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण रोज कुठे ना कुठे घडत आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे पण त्यासोबत समाजाने जागृत राहिले पाहिजे.स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर बहिष्कार टाकला पाहिजे. समाजात स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या चांगल्या संस्कारांची गरज वाढलेली आहे. बदलापुरात झालेल्या प्रकरणाचा आपण तीव्र निषेध करत आहोत यातील आरोपीला कठोरात कठोर फाशीचे शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नामदार रामदास आठवले यांनी यावेळी केली.