बातमी 24तास
(आळंदी, :आरिफभाई शेख )
अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत देखरेख करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बारा वर्षीय मुलाला धाक दाखवून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे
याप्रकरणी व्यंकटेश आदिनाथ माळणुर सध्या राहणार आळंदी याला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आळंदी पुण्य भूमी वारंवार अशा प्रकाराने बदनाम होत आहे. माऊलींच्याच नावावर चालणाऱ्या संस्था मात्र लहान लेकरांना घाणेरडे कृत्याने आळंदीच्या नावलौकीकाला या अशा उपद्रवी इसमानमुळे डाग लागत आहे आळंदीत यापूर्वी अशा पाच घटना घडल्या आहेत यामध्ये अल्पवयीन लहान मुले भेदरलेल्या अवस्थेत तक्रारी देताना दिसून आले परंतु यावर आळा बसणे गरजेचे आहे सविस्तर माहिती अशी की आळंदीत एका महाराजाच्या अधिपत्याखाली सदर अनाथ बालक आश्रम चालवले जाते पुण्याच्या समाज कल्याण विभागामार्फत पीडित बालकाला या ठिकाणी ठेवण्यात आले होते पीडित बालकाची आई वारल्याने तो अनाथ झाला होता. अशाच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आनंदीतील बऱ्याच ठिकाणी संशयाची सुई फिरत आहे तक्रार केली तर आई-वडील काय म्हणतील आणि आई-वडिलांसमोर सुसंस्कारित असल्याचे आव आणणारे महाभाग ही असल्याचे चर्चेत माहिती होत आहे. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे अशी भेदरलेली अवस्था पीडित मुलांची असते. यावर वाचा फोडावी म्हणून वारंवार संघटन केले ही जाते परंतु या गुन्ह्याला प्रतिबंध लागण्याचे काही नाव घेतले जात नाही ही आळंदीची आळंदीच्या पुण्यभूमीची बदनामी आहे मुळात आळंदीच्याच नावाने नावलौकिक कमवायचे आणि आळंदी मध्येच असे गैरप्रकार होतात याबाबत शर्मिने मान खाली जायला हवी दरम्यान आरोपी व्यंकटेश काशिनाथ महानोर याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिलेली आहे.