बातमी24तास चाकण (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य सेनानी कै. द. भि. तथा मामा शिंदे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त श्री शिवाजी विद्यामंदिर येथील प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात हिमोग्लोबिन टेस्ट, एचबी टेस्ट, सीबीसी टेस्ट, सह रक्तातील १६ घटक चाचणी तपासणी करण्यात आली. वैद्यकीय शिबिरात ८०० मुलींनी सहभाग नोंदविला. या टेस्ट घेण्यासाठी तालुका आरोग्यधिकारी डाॅ. इंदिरा पारखे, आरोग्यवर्धिनी केंद्र शेलपिंपळगाव तसेच भारतमाता प्रमोद सुधाजी म. सा. चॅरिटेबल ट्रस्ट यांनी सहकार्य केले. एकूण ३००० मुलांची वैद्यकीय तपासणी टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे व गरजूंना गोळ्या औषधे ही पुरवली जाणार आहे. असे दुर्गाई हृदय प्रतिष्ठान चे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी सांगितले. यावेळी ५० गरीब, गरजू मुलांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. तसेच पाच मुलांना हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी प्राचार्य अनिल ठुबे, कालिदास वाडेकर, दत्तात्रय भेगडे, रामदास जाधव, अतुल वाव्हळ, मीनाताई शिंदे आदींनी कै. मामासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी निलेश गोरे, दत्तात्रय गोरे अण्णा, अशोक जाधव, संदीप परदेशी, संजय बोथरा, राहूल नायकवाडी, प्रशांत गोलांडे, प्रशांत गोरे, मधुकर शेटे, कविता गोरे, राजेंद्र खरमाटे, बिपीन रासकर, सुभाष शिंदे, अनिल जगनाडे, मित्तल शहा, राजेंद्र जगनाडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ कांडगे तर प्रास्ताविक राजेंद्र शिंदे व आभार संजय शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीमा शिंदे, निकीता शिंदे, रूपाली खुडे, मनिषा पवार, प्रशांत गोलांडे, अंकुश डोंगरे, नाझीम सिकीलकर, आदींनी परिश्रम घेतले