बातमी24तास्(वृत्त सेवा) खेड तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आज चाकण येथील “चाकण ग्रँड”या हॉटेल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये खेड विधानसभा ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी हा ठराव मंजूर करण्यात आला. आणि ही जागा न सोडल्यास सांगलीची पुनरावृत्ती काँग्रेस खेड मध्ये करणार असल्याचे या वेळी ठरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सचिव अमोल दौंडकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत गोरे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जमिरभाई काझी, पुणे जिल्हा लीगल सेल चे अध्यक्षा जयाताई मोरे, पुणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतिश मांजरे, खेड तालुका युवक अध्यक्ष गणेश सहाणे, चाकण शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, पुणे जिल्हा काँग्रेस चे सदस्य सुनील मिंडे, किसान काँग्रेस चे उपाध्यक्ष पवार, खेड तालुका युवक काँग्रेसचे सचिव धनेश म्हसे पाटील, आळंदी शहर अध्यक्ष उमेशजी रानवडे चाकण शहर युवक अध्यक्ष मयूर आगरकर त्याप्रमाणे कावेरी गुंजाळ, चेअरमन कोये रामदास राळे, सरपंच कडूस रमेश नेहरे यावेळी उपस्थित होते.