जनजीवन विस्कळीत, महापालिका प्रशासनासोबत परिवर्तन हेल्पलाईन ‘ऑन फिल्ड’
बातमी24तास पिंपरी, प्रतिनिधी ,
पुणे, पिंपरी-चिंचवडसह परिसरात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांसाठी मदतकार्य करण्याकरिता ‘टीम एमडी’ आणि परिवर्तन हेल्पलाईनचे स्वयंसेवक ‘ऑन फिल्ड’ उतरले आहेत. पुणे हवामान खात्याने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून पावसाने शहराला झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. भोसरी विधानसभा क्षेत्रात काम करणारी ‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’ आणि स्वयंसेवक महापालिका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत नागरिकांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. कामगार नेते सचिन लांडगे यांनी भोसरी आणि सभोवताल्या परिसरात मततकार्य सुरू केले आहे. तसेच, आमदार महेश लांडगे यांनी चिखली, मोशी, चऱ्होली या भागात पाहणी आणि मदत कार्यासाठी धाव घेतली आहे. तसेच, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महापालिकेने सर्व प्रभाग तसेच सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पुर नियंत्रण कक्ष सुरु केला आहे.
शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. शहरातील आपत्कालीन पूर नियंत्रण हेल्पलाइन…◆ मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष: 020-28331111/67331111 ◆ क्षेत्रीय कार्यालय (अ): 020-68334050/9922501454 ◆ क्षेत्रीय कार्यालय (ब): 9922501456 ◆ क्षेत्रीय कार्यालय (क): 020-68334550/9922501458 ◆ क्षेत्रीय कार्यालय (ड): 020-6834750/9922501460 ◆ क्षेत्रीय कार्यालय (इ): 020-020-68335050/8605722777 ◆ क्षेत्रीय कार्यालय (फ): 020-68335350/8605422888 ◆ क्षेत्रीय कार्यालय (ग): 020-68335550/7887879555 ◆ क्षेत्रीय कार्यालय (ह): 020-68335750/9130050666, अन्य हेल्पलाइन क्रमांक: ◆ सारथी हेल्पलाइन: 8888006666 ◆ परिवर्तन हेल्पलाइन: 9379909090