खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मी सेवेकरी फाऊंडेशनच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न
बातमी24तास्
राजगुरुनगर : आयुष्यात गुणवत्तेबरोबर सामाजिक ज्ञान अतिशय महत्वाचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर केल्यावर जीवन यशस्वी आणि सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्य परीक्षा परिषेदेचे माजी आयुक्त अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले.खेड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व मी सेवेकरी फाऊंडेशन यांच्या वतीने वाकी येथील साईकृपा लॉन्स मध्ये आयोजित दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गुंजाळ बोलत होते.
यावेळी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, मी सेवेकरी फौंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे , जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर , विश्वस्त शिवाजी किलकिले ,राष्ट्रपती पुरस्कृत मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, उपाध्यक्ष मधुकर नाईक , तालुका संघाचे अध्यक्ष संजय बोरकर ,सचिव रामदास पवार, जिल्हा संघाचे उत्तम पोटवडे,रामदास व्यवहारे,दत्तात्रय मांजरे, किसन धंद्रे ,अंकुश सांडभोर, छाया लाटे ,संध्या कांबळे,रवींद्र चौधरी,विषयतज्ञ दयानंद शिंदे आदी मान्यवरांसह सुमारे ५७० विद्यार्थी ,शिक्षक पालक उपस्थित होते.