बातमी 24तास
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पूरस्थिती पुणे जिल्ह्यात शहर सर्व भागात निर्माण झाली आहे. कमरेच्या वर जाईल इतके पाणी पुण्याच्या सकल भागामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीचा तडाका पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे .याचा परिणाम आळंदीच्या इंद्रायणी नदीला होत असून आळंदी हे इंद्रायणी तीरावर असल्याने दक्षता घेण्याच्या सूचना सहाय्यक अभियंता मोशी पाटबंधारे शाखा मोशी त्याचबरोबर मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद आळंदी आळंदी पोलीस स्टेशन आळंदी यांचे कडून धोक्याच्या सूचना जारी करण्यात आली आहे.
आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घेण्यात यावी.तरी इंद्रायणी नदीवरील देहू ते तुळापूर या मधील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. पुर परिस्थितीमध्ये इंद्रायणी नदीपात्रामध्ये न जाणे तसेच कोणत्याही प्रकारची वाहतूक बंधाऱ्यावरून न करणेबाबत मोशी शाखेमार्फत सर्वांना आवाहन करण्यात येत आहे..आळंदी हे नदी किनारी असणारे गाव असल्यान काळजी घेतली जात आहे .आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे नदी किनारा वर असणारी ये जा करणे वहिवाट करणे त्वरित थांबवले जावे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घेतली जावी. अशा सूचना मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद आळंदी पोलीस स्टेशन प्रशासन विभाग यांच्याकडून करण्यात आलेली आहे.