बातमी 24तास Web News Portal
(प्रतिनिधी आरीफभाई शेख) श्री तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रमुख म्हणून एडवोकेट विकास ढगे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. एडवोकेट ढगे हे दोन वेळा प्रमुख विश्वस्त आणि तीन वेळा सोहळा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणारे पहिले विश्वस्त आहेत. एडवोकेट ढगे यांची सोहळा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्या बाबतचे पत्रक श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 16 मे 2013 रोजी सर्व विश्वस्तांची मुदत संपुष्टात आली आहे परंतु आषाढी वारी तोंडावर असताना वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून उर्वरित असलेल्या तीन विश्वस्तांना मुदतवाढ देण्यात आली आहे यामध्ये एडवोकेट विकास ढगे लक्ष्मीकांत देशमुख आणि योगेश देसाई या विश्वस्तांचा समावेश आहे. मुदत समाप्ती मध्ये सर्वच्या सर्व सहा विश्वस्त यांची पदे रिक्त झाली असून. आषाढी वारी नंतर सदर पदे भरण्यात येणार आहे. पैकी प्रथम टप्प्यामध्ये तीन पदे विश्वस्त म्हणून भरण्यात येतील दिनांक 11 जून रोजी माऊलींचे प्रस्थान आळंदीतून पंढरपूर साठी होईल आणि 29 जुलै रोजी पंढरपूरची आषाढी वारी भरणार आहे या कालखंडामध्ये आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी या सर्व प्रवासामध्ये वारकऱ्यांना योग्य त्या सुविधा त्यांच्या आरोग्याची काळजी त्याच बरोबर पालखी सोहळा उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे एडवोकेट विकास ढगे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे.