बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
राजगुरुनगर :जोडीदाराचा स्वभाव, आवडीनिवडी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असल्यास दोघांना एकमेकांसोबत आयुष्य काढणं कठीण असते, आणि मग विभक्त होणे हा एकच पर्याय असतो अशाच एका प्रकारणात खेड न्यायालयाने अभूतपूर्व निकाल देत पहिल्याच तारखेला घटस्फोट मंजूर केला. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीमान राजा आणि श्रीमती राणी (नावे बदलली आहेत) यांचा विवाह 10 मे 2022 रोजी झाला होता, परंतु लग्नानंतर एका महिन्याच्या आत दोघांचाही स्वभाव, आवडीनिवडी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असल्याचे दिसून आले.या प्रकारणात मित्र आणि नातेवाईकांनी दोघांची समजूत काढल्यानंतरही दोघांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेतल्याने दोघांनीही परस्पर समजुतीतून वेगळे होण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी खेड न्यायालयात कार्यरत असले ॲड. आकाश पन्नालाल चोरडिया, ॲड. ऐश्वर्या स. शेवकरी, ॲड. दिपाली स.सहाणे यांच्यामार्फत विवाह याचिका 14/02/2024 रोजी सादर केली होती. 22/02/2024 रोजी पहिली सुनावणी नियुक्त करण्यात आली. विवाहित जोडप्याच्या समजुतीच्या भूमिकेला दाद देत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड श्री.एम.बी.पाटील यांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करून दोघांनाही वैयक्तिक बंधनातून मुक्त केले आहे.
*बऱ्याचदा वैवाहिक वादापश्चात नवरा-बायकोची एकत्रित येण्याची इच्छा संपुष्टात येते परंतु अहंकार, एकमेकां विषयीचा राग तसेच घटस्फोटाची प्रक्रिया बऱ्यापैकी किचकट असल्यामुळे विवाहित दाम्पत्याचे तारुण्य वादातच निघून जाते. सदर बाबीची दखल घेऊन लवकरात लवकर घटस्फोट मंजूर करण्याचा मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड (श्री.एम.बी.पाटील) यांचा निर्णय स्वागतार्ह आहे.- अॅड. आकाश पन्नालाल चोरडिया (अर्जदारांचे वकील)