पुणे मेट्रो विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावाचा नवा वाद समोर आला आहे.
बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल
पुणे : पुणे मेट्रो विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावाचा नवा वाद समोर आला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवार पेठ स्थानक नावाचा बोर्ड तोडून शिवसैनिकांनी तिथे कसबा पेठ स्थानक असा बोर्ड लावला आहे. शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे आणि शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन करत हा बोर्ड लावला.
पुण्याची मेट्रो सतत काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत राहिली आहे. याआधीही शिवसेनेकडून नाव बदलून कसबा पेठ स्थानक नाव द्या अशी मागणी करण्यात आली होती.मात्र मेट्रो प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मेट्रो ऑफिसला घेराव घातला आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सेवा सुरू का करत नाही? असा जाबही शिवसैनिकांनी मेट्रो प्रशासनाला विचारला. आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी गेटवरच अडवलं, तर काही शिवसैनिक आत घुसले.
भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी: याआधी मेट्रो मार्गावरच्या भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणीही करण्यात आली होती. शिवाजी नगर कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय या मार्गावर भोसरी स्टेशन आहे, पण मेट्रो स्टेशनवरून भोसरी 5 किमी अंतरावर आहे. भोसरी मेट्रो स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या भागाचं नाव नाशिक फाटा आहे, त्यामुळे भोसरी स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी नागरिकांनी केली होती.