प्रतिनिधी: अनंत श्री विभूषित जगद्गगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम 18 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी चाकण जवळील कडाचीवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य दिव्य अशा अध्यात्मिक सोहळ्यास पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकभक्तांची गर्दी होणार असून त्या ठिकाणी सकाळपासून जगद्गुरु श्रींचा महा सत्संग सिद्ध पादुकांची मिरवणूक व आगमन गुरुपूजन, उपासक दिक्षा, दर्शन, प्रवचन, असाच पूर्ण दिवसाचा भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान तर्फे विविध उपयोगी सेवा व उपक्रम राबविणे जातात त्यात प्रामुख्याने शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी, आपातकालीन मदत, अंधश्रद्धा निर्मूलन, दुर्बल घटक मदत, अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात.तरी सर्व खेड तालुक्यातील भाविक भक्तांनी अध्यात्म विज्ञान व व्यवहार या त्रिसूत्रीची सांगड घालणाऱ्या या अनमोल व जीवन बदलविणाऱ्या सुंदर भक्तीमय संगीतमय, दैदिप्यमान, मन हेलावून टाकणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.