बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(कल्पेश अ. भोई ) : वाढती महागाई, बेरोजगारी आणि सत्तेसाठी सुरू असलेले राजकारण यामुळे लोकांचा विश्वास उडत चालला आहे.राज्यात गुंडगिरी वाढीस लागली आहे.राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही असा गंभीर आरोप माजी आमदार तथा काँग्रेस पक्ष निरीक्षक रामहरी रुपनवर यांनी राज्य सरकारवर केले.
खेड तालुका युवक काँग्रेस,खेड तालुका काँग्रेस आणि खेड तालुका महिला काँग्रेस यांच्या वतीने महाराष्ट्रात येणारे उद्योग-धंदे गुजरातला स्थलांतरीत होत आहेत.स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या पेपरफुटी प्रकरण आणि राज्य सरकारचे विद्यार्थी विरोधी धोरण, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. गुजरात प्रेमी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत चाकणच्या माणिक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार तथा पक्ष निरीक्षक रामहरी रुपनवर,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेश ढमढेरे,महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल दौंडकर, जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस महेश टापरे,तालुका अध्यक्ष गणेश सहाणे,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे,राजेश वाघूले,माजी सभापती सतीश राक्षे,जमीर काझी,अतिश मांजरे पाटील,अनुराग जैद,बाळासाहेब गायकवाड,धनेश म्हसे,मयुर आगरकर,जमीर शेख,वसीम शेख,संकेत गवारी,चंद्रशेखर जाधव,सचिन नरके,वंदना सातपुते,गीताबाई मांडेकर,प्रियंका बंडगर,भास्कर तुळवे आदी उपस्थित होते.काँग्रेसचे कार्यकाळात शेतकरी एक टन शेतीमाल विक्री करून एक तोळा सोने खरेदी करत होता.मात्र भाजप सरकारच्या कालखंडात शेतीमालाला बाजारभाव नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे.अशा निष्क्रिय सरकारला खाली खेचायला हवे,सत्ताधारी पक्षावर असा घणाघात किसान मोर्चाचे चंद्रकांत गोरे यांनी केला.