(वृत्त सेवा) : अँटोलिन इंडिया, जागतिक बाजार पेठेतील योगदान कर्ता अँटोलिन कंपनीचा भाग असून, 18 जानेवारी 2024 रोजी चाकण, पुणे येथे या कंपनीने नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे.
अँटोलिनचा हा भारतातील पहिला प्रकाशयोजना, HMI प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक्स सुविधा देणारा प्लांट आहे, ज्यामध्ये दोन वर्षांत 200 हून अधिक अत्यंत कुशल आणि अनुभवी कर्मचार्यांच्या टीम कार्यरत आहे. अत्याधुनिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे, अँटोलिन भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या ग्राहकांसाठी खास करून टाटा, टोयोटो, महिंद्रा, आणि स्कोडा व्हीडब्लू यांसाठी प्रगत उपाय आणि घटक तयार करेल.चाकण औद्योगिक क्षेत्रातील या अत्याधुनिक सुविधेमध्ये 35000 चौरस फूट उत्पादन, असेंब्लि आणि कार्यालयेचा समावेश आहे.नवीन कारखान्यात विकसित होणार्या प्रकल्पांमध्ये महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनासाठी लागणाऱ्या तसेच टाटाच्या सफारी आणि हॅरियर मॉडेल्ससाठी लागणाऱ्या प्रकाशयोजना – Ambient Lighting तसेच नाविन्यपूर्ण टचकंट्रोल पॅनेल प्रकल्पाचा समावेश आहे.
या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सजावटीच्या स्मार्ट पृष्ठभाग (Smart Surface), बहुरंगी वातावरणीय प्रकाशयोजना (Multicolor Ambient Lighting), कॅपेसिटिव्ह स्विचेस आणि इलेक्ट्रॉनिक्स याचा समावेश आहे. हे नवीन डिझाईन अनेक HMI फंक्शन्स एकत्र करून, या भागाची रचना इंटरफेस आणि वाहन कस्टमाइझेशन करून अंतिम वापरकर्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय देते.स्पेशलाइज्ड टीमच्या सहाय्याने, अँटोलिन भारतातील वाहन उत्पादकांकडून स्मार्ट प्रगत पृष्ठभाग(Smart Advanced Surface) आणि फंक्शनल लाइटिंगच्या उदयोन्मुख मागणीचा उपयोग करण्यास सक्षम असेल आणि प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी अधिक प्रगत अंतर्भाग विकसित करू शकेल. अशा प्रकारे अँटोलिनत्याचे औद्योगिक आणि तांत्रिक क्षमता सुधारित करते. आणि अशा प्रकारे अँटोलिन जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोटिव्ह बाजारपेठेतील एक क्षमता म्हणून तंत्रज्ञान व्यवसायात आगामी वर्षांमध्ये कंपनीच्या वाढीमागील प्रेरकशक्ती असेल.
याप्रसंगी बोलताना, अँटोलिन कंपनीचे अध्यक्ष श्री. अर्नेस्टो अँटोलिन म्हणाले, “चाकण नवीन प्लांटमधील विशेष प्रकाश योजना, एचएमआय आणि इलेक्ट्रॉनिक सोल्यूशन्स टीमच्या सहकार्याने आम्ही आमच्या ग्राहकांच्या अधिक जवळ असू जेणे करून आम्हाला त्यांच्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेत नावीन्यपूर्ण आणि तांत्रिक विकासामध्ये सहयोग करता येईल. आम्ही अशा देशात विस्तार करत आहोत जो येत्या काही वर्षांत अँटोलिन साठी एक मोठे तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्र निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठ्या वाढीच्या संधी प्रदानकरतो.”अर्नेस्टो अँटोलिनयांनी ऑटोमोबाईल उद्योगातील ग्राहकांचे त्यांच्या प्रोत्साहन आणि समर्थनाबद्दल कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी या आधुनिक सुविधेच्या निर्मितीसाठी केल्या गेलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कर्मचाऱ्यांचेदेखीलकौतुककेले.प्रमुख पाहुणे आणि टाटामोटर्सचे सीपीओ श्री हेमंत बर्गे हे या उदघाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते. मुंबईतील वाणिज्य आणि व्यावसायिक दूतावास समुपदेशक व्हिसेंट गोमिस रुईझ, टाटा मोटर्सचे इतर वरिष्ठ प्रतिनिधी आणि अँटोलिनचे उच्च अधिकारी देखील या प्लांटच्या उद्घाटनाला उपस्थित होते.अँटोलिनकडे दीर्घकालीन परिवर्तन विकास प्रकल्प(2023-2026) सुरू आहे. आशिया मध्ये आणि विशेषत: भारतीय बाजार पेठेत वाढ आणि विस्तार करणे हा या योजनेचा एक मूलभूत स्तंभ आहे.भारतात अँटोलिनचे 9 उत्पादन सुविधा, 2 तांत्रिक डिझाईन केंद्रे आणि सुमारे 2000 उच्चशिक्षित कर्मचारी असलेले एक भक्कम औद्योगिक आणि विक्री नेटवर्क आहे.ही कंपनी ओव्हर हेड सिस्टीममध्ये अग्रणी मार्केट लीडर आहे. अँटोलिन बद्दलअँटोलिन ही जगातील वाहन घटकांची जगातील मोठ्या उत्पादकांपैकी आणि ऑटोमोटिव्ह इंटिरिअर्ससाठी जागतिक पुरवठादार कंपनी आहे. कंपनी 26 देशांमध्ये 140 कारखान्यांद्वारे जगातील आघाडीच्या कार उत्पादकांना पुरवठा करते. ग्रूपो अँटोलिन मध्ये 25,000 कर्मचारी आहेत आणि 2021 मध्ये €4,055 दशलक्षची विक्री आहे. ग्रूपो अँटोलिन चार बिझनेस युनिट्स – ओव्हरहेड्स, कॉकपिट्स आणि डोअर्स, लाइटिंग आणि HMI आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स द्वारे उच्च मूल्य उत्पादने ऑफर करते.