
बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल
(चाकण प्रतिनिधी ) : येथील माणिक चौकात असलेल्या सुप्रसिद्ध वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्स व शोभा सारीज यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या खरेदीवर लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याच्या आगळ्यावेगळ्या लकी ड्रॉ योजनेचा समारोप नुकताच संपन्न झाला. 216 बक्षिसांची लयलूट या योजनेत केली गेली. यावेळी भोलेनाथ पडवळ हे पहिल्या क्रमांकाच्या दुचाकीचे विजेते ठरले. या योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे, संचालक नकुल दत्तराज वाफगावकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना संचालक नकुल वाफगावकर म्हणाले दसरा व दिवाळीनिमित्त ग्राहकांचा सोन्या – चांदीचे दागिने व कपडे खरेदी करण्याकडे विशेष कल असतो. ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगणित करण्यासाठी दागिने खरेदीवर भरघोस बक्षीस देण्याची योजना आम्ही सादर केली होती .
