इंद्रायणी नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी सर्व विभागांनी ठोस उपाययोजना करावी : नितीन गोरे, सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(पुणे वृत्त सेवा ) इंद्रायणी नदी वरील वाढते प्रदूषण,तीर्थक्षेत्र आळंदी मधील नदी पात्रात आलेला फेस या गंभीर विषयावर चर्चा करुन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नितीन गोरे, सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयात दिनांक २३ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती,यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,आळंदी नगरपरिषद,जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी नितीन गोरे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून इंद्रायणी नदीचे प्रदुषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

यावेळी अधिकाऱ्यांनी आपण ह्या विषयावर करत असेलेले प्रकल्प,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,नदी सुशोभीकरण आराखडा याची माहिती दिली.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यात महत्वाची भूमिका असून त्यांच्या हद्दीतील सर्व S.T.P व E.T.P लवकरात लवकर कार्यान्वित करावेत असे गोरे यांनी सांगितले,तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निर्माण होणारे सांडपाणी STP मार्फत प्रक्रिया करुन औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना ते पुन्हा वापरता येवू शकते अश्या सूचना केल्या. यावेळी महा.प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे,उपविभागीय अधिकारी मंचक जाधव ,आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी केंद्रे , पिंपरी चिंचवड महापालिकेचे योगेश आल्हाट,विलास देसले , सोहण निकम,खेड पंचायत समितीच्या धोंडे मॅडम, माणिक शिंदे ,चिन्मय नागपूरकर यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy