(प्रतिनिधी आरिफभाई शेख)आळंदी: श्री तीर्थक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी यात्रा अर्थात श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा भरणार आहे त्यासाठी प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे त्यांनी आज आळंदी येथील आळंदी नगरपरिषद सभागृहामध्ये आढावा बैठक आयोजित केली होती.
आज दिनांक 23 11 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदर आढावा बैठकीमध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचा विचार केला जाणार आहे. आळंदी नगरपरिषद कार्यालय मध्ये कार्तिकी यात्रा आढावा बैठकीमध्ये विविध विभागांचा असणाऱ्या कामाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली या बैठकीला तहसीलदार प्रशांत बेडम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे. पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गोर. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे आळंदी दिघे वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक नांदुरकर. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍड विकास ढगे. विश्वस्त योगिनी रंजना व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर. डी.डी. भोसले.प्रशांत कुऱ्हाडे.सचिन गिलबिले. राहुल चव्हाण. एम एस ई बी पी एम पी एल सार्वजनिक बांधकाम विभाग एस टी महामंडळ. आणि संबंधित शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यात्रा काळामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज तो प्रदूषण नको याबाबतच्या सूचना देण्यात आलेले आहेत तसेच शारीरिक बांधकाम विभागाने मरकळ रोड रस्ता देहू फाटा केळगाव रोड चाकण चौक या आणि इतर रस्त्यामध्ये असणाऱ्या विविध खड्ड्यांमुळे गर्दीच्या वेळी अडथळा निर्माण होत असतो सदर क्रांती करण्याच्या सूचना प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांनी दिले आहे.
यात्रा काळामध्ये घरगुती गॅस तपासणीच्या बाबत समिती गठीत करण्यात येणार असून मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने आळंदीतील अतिक्रमणांचा आढावा घेत त्यावर कारवाई करण्यात येणार आहे 24 तास विद्युत पुरवठा रावा यासाठी एम एस सी बी ला विशेष सूचना देण्यात आलेले आहेत तसेच आळंदी पोलिसांच्या वतीने रस्त्यावरील सुरक्षा साठी तैनात करण्यात येणारे मंडप इतर सुविधा या दिनांक पाच रोजी च्या आधीच पूर्ण तयारीनिशी पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस आयुक्त डोईफोडे यांनी केलेल्या सूचनाप्रमाणे आळंदीतील रहदारीचे रस्त्यावर मुख्य प्रमाणात महाद्वार रस्त्यावर नोकर 2 तयार करण्यात आलेला असून गर्दीच्या वरदळीच्या ठिकाणी कुठल्याही दुकानदारांना बसन्यास परवानगी दिली जाणार नाही. आळंदीतील इतर रस्त्यांवर दुकानदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी काही दिलेली आहे प्रदक्षिणा रस्ता प्रदक्षिणा मार्ग वगळता गर्दीचे ठिकाणी वगळता इतर ठिकाणी व्यापारी व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी बसण्यात हरकत केले जाणार नाही अशी माहिती पोलीस आयुक्त राजेश डोईफोडे यांनी बैठकीदरम्यान दिले आळंदीतील इंद्रायणी नदीवर दान करण्यासाठी यात्रा पूर्वी दोन दिवस आधी स्वच्छ पाण्याची व्यवस्था वडिवडे धरणातून करण्यात येणार असल्याचे यापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले होते त्यावरही निश्चित असा विचारविनिमय होऊन कारवाई करण्यात येणार आहे दर्शन बारी मुळे रस्त्यावर होणारे अडथळे याबाबतही पोलीस प्रशासनाकडून लक्ष वेधण्यात आलं त्यावर विश्वस्त कमिटीच्या तर्फे एडवोकेट विकास ढगे यांनी त्याबाबतच्या योग्य त्या सूचनांचा अवलंब केला जाईल अशी माहिती दिली आहे एस टी महामंडळ यांची जागा रिक्त करून इतर ठिकाणी यात्रा काळासाठी एकटी आणि पीएमटी ची व्यवस्था करण्याबाबत सूचनांवर विचार केला जात आहे अवाजवी आवाज आणि आवाजावर मर्यादा ठेवण्यासाठी विशेष सूचनाही प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांच्या आदेशाने देण्यात आलेले आहेत दिनांक पाच डिसेंबर ते १२ डिसेंबर या काळात मोठ्या प्रमाणात यात्रा भरदार असून नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्याची मुख्य जबाबदारी आळंदी नगर परिषदेकडे राहणार आहे रोगराई वाढू नये म्हणून औषध फवारणी डास निर्मूलनासाठी फवारणी पावडर व आरोग्य पथक यांना विशेष सूचनाही त्याबाबत देण्यात आलेल्या आहेत. देहू रोड या ठिकाणी बस स्टॉप ची व्यवस्था करून प्रत्येक बस स्टॉप वर पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत आळंदी नगर परिषदेने कच्चे पाणीपुरवठा भाविकांना होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही आहेत तसेच सुमारे ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करत त्याबाबतची देखरेख करणे पाटबंधारे विभागाने यात्रेपूर्वी आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छ पाणी सोडणे तसेच दर्शन बारीचे काम हे पाच तारखेच्या पूर्वी पूर्ण करण्याच्या बाबत आळंदी पोलिसांकडून सूचना करण्यात आली पोलीस बंदोबस्ताला दिनांक चार पासूनच आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे आळंदी नगर परिषदेने स्वच्छतेसाठी जास्तीचे लक्ष देण्याची गरज व्यक्त करत स्वच्छतेबाबतही आढावा घेण्यात आला.