बहुळाई मातेचा व बहुळ गावाचा इतिहास नंद राजांच्या दस्तांमध्ये आढळतो. त्यानुसार बहुळ येथील बारामाही पाणी असलेले गायमुख भगवान श्रीकृष्ण युगातील म्हणजेच द्वापार युगातील आहे. ज्या वेळेला कृष्ण भगवान आठ वर्षाचे होते. त्या वेळेला सवंगड्या सोबत यमुनेच्या काठी काला करत असत. त्या काल्याचा सुगंध देव लोकापर्यंत गेल्यानंतर देवांना देखील काल्याचा प्रसाद खाण्याचा मोह आवरला नाही. ब्रह्मदेव काल्याचा प्रसाद खाण्यासाठी भूतलावर अवतरले आले, परंतु ब्रह्मदेवांना व इतर देवांना प्रसाद मिळाला नाही.दुसऱ्या दिवशी काला सुरू झाला. त्यावेळेस इतर देवांनी खाल्याचा प्रसाद मिळण्यासाठी मच्छरूप धारण केले. ब्रह्मदेवाने प्रसाद न मिळाल्या मूळे भगवंताची गायगुरे- वासरे चोरून नेली व ती सिद्धबेटाजवळ दंडक अरण्यात (आजचा बहुळ चिंचोशी परिसर) ठेवली. त्या वेळेला कृष्णांनी मायावी यमुना नदी व गोकुळ निर्माण केलं होतं. नंतर कालांतराने ब्रह्मदेवाने गाई गुरे कृष्णाला परत दिली. त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण च्या १९ लाख गाया पैकी १ गाई स्वतः कामधेनू (बहुला) होती. मायावी गोकुळ व यमुना गुप्त झाली तेव्हा त्या कामधेनू गाई ला तहान लागली असता तिने श्रीकृष्ण भगवंताला विचारले मला पाणी दे. त्यावेळेला भगवंताने तिला सांगितले की इथून दक्षिणेकडे शिंग मारत जा आणि जिथे पाणी निघेल तिथे पाणी पी व परत ये. गाई शिंग मारत चाफेनगर या हद्दी मध्ये आली. आणि तिथे तिला शिंगाने पाणी मिळाले. मग ज्या ठिकाणी पाणी मिळाले तेच आपले आजचे जागृत श्रीक्षेत्र बहुळ येथील अखंड स्त्रोत बारामाही पाणी असलेले गायमुख. आजही त्या कामधेनु गो मातेची समाधी चिंचोशी येथील गोकूळ नगर येथे आहे. द्वापार युगा पासून आज तागायत गाय मुखातून जिवंत पाण्याचा अमृतमय झरा वाहत आहे तसेच या गायमुखाशेजारी गाईची समाधीच्या ठिकाणाहून वाहत येणारा बहुळाई ओढा आहे.