(प्रतिनिधी आरिफ भाई शेख) विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सध्या अजब प्रकार चालू आहे. पुणे युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेला कार्यकालचा जीआर अचानकपणे अंमलबजावणीसाठी घेतल्यामुळे,बऱ्याच विद्यार्थ्यांचे वर्ष शैक्षणिक करिअर हे बरबाद झाले आहे. या अचानक झालेल्या प्रकारामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाकडे धाव आणि पुढे काही होणार नाही म्हणून अक्षरशा बऱ्याच मुला मुलींना अश्रू अनावर झाले.
विद्यापीठांमध्ये माहिती मागितली असता खालील काउंटरवर व्यवस्थित माहिती न देता टाळाटाळ होत उडवा उडवी ची उत्तरे मिळत असल्याचे विद्यार्थी बोलून दाखवत होते. मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षाच्या कार्यकालाचा अभ्यासक्रम हा पाच वर्षात पूर्ण करावा आणि कुलगुरूकडील एक वर्ष वाढून मिळून असे सहा वर्षात अभ्यासक्रम पूर्ण न झालेस त्या विद्यार्थ्यांची विद्यापीठातील नोंदणी ही रद्द करण्यात आली आहे.अभ्यासात दंग असलेले विद्यार्थी या अचानक धक्याने घाबरल्याचे दिसून आले. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअर, सुधारणा ,आणि सुविधा, साठी असते.मात्र येथे तर हा सावळा बाजार पाहून अक्षरशः रडकुंडीला आलेले विद्यार्थी पाहावयास मिळाले. पुणे विद्यापीठ येथे अहमदनगर हुन आलेल्या एका विद्यार्थ्याला सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजले पर्यंत काहीही मदत मिळू शकली नाही. यावेळी युवक काँगेस आय कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अक्षय जैन हे एका कामासाठी विद्यापीठात आले असता, सदर विद्यार्थ्यांनी तझालेल्या त्रासाचा पाढा वाचला हे ऐकतात अक्षय जैन यांनी संबंधित विद्यापीठ जबाबदार कर्मचाऱ्यांची तातडीने भेट घेतली असता,तेथे परिस्थिती वेगळीच होती. विद्यार्थी विद्यापीठात येऊ नये म्हणून जास्तीची सेक्युरिटी फोर्स भरायला पाहिजे अशी अजब मागणी सेवा सुविधा पुरवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं असल्याचे ऐकावयास मिळाले. दरम्यान सकाळपासून ताटकळत उभे राहिलेले विद्यार्थी, लंच टाईम झाल्याने परीक्षा विभागातील जबाबदार कर्मचारी उपलब्ध न झाल्याने सैरावैरा होत व्याकुळ झालेले दिसले. या विद्यार्थ्यांचे मोठ नुकसान होत आणि शैक्षणिक करियर या जीआर मुळे बरबाद होत आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा करण्यासाठी विद्यापीठ गाठले. दरम्यान परीक्षा विभागातून खाली उतरत असताना विद्यार्थ्यांच्या टोळक्या मधून आम्ही आता आत्महत्या करतो अशी आर्त वेदनादायी हाक ही ऐकू येत होती. कॉलेजमधून मदत घ्यावी तर युनिव्हर्सिटीचा परवानगीचा फार्स पूर्ण करावा लागतो.आणि युनिव्हर्सिटी वेळेत मदत करत नाही. अशा परिस्थितीमुळे परगावाहून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मात्र इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीमध्ये व्याकुळ झालेले दिसले. गावाकडून शिक्षणासाठी परगावी आलेले विद्यार्थ्यांचे आयुष्य या जीआर मुळे बरबाद झालेले दिसून येत आहे.यामध्ये स्वतःची भूमिका कोणी घेत नाही. अश्या परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी मर्यादा असणारा जीआर हा कोणाच हित राखण्यासाठी हा प्रश्न उभा राहत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विशेष वर्ष ठरवून देणे आणि त्यामुळे शिक्षणापासून मोठा विद्यार्थी वर्ग दूर लोटणे हे कितपत योग्य आहे.विद्यार्थीना शिक्षण पूर्ण करण्यासाठी जर अटी घातल्या जात असतील तर शिक्षणाच माहेरघर ही म्हण खोडून काढावी लागेल. शिक्षण वेळेत पूर्ण करावं हा जुलमी जीआर किती विद्यार्थ्यांच्या शिक्षण करिअरचा बळी घेणार. आणि त्या पाठोपाठच मुलं शिकावी म्हणून परगावात पाठवणारे आई-वडिलांनी ज्या खस्ता खात शिक्षणासाठी कर्ज घेतलं त्यांचे डोळे मात्र आभाळाकडे लागले आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील आणि हे पाप महाराष्ट्र शासनाचा हलगर्जीपणा चे असेल याबाबत दुमत नाही. पुणे युनिव्हर्सिटी ला रोज हजारो मेल येतात. पुणे युनिव्हर्सिटी हि कॉलेज कडून आलेले ई मेल जबाबदारीने हाताळत नाही. हे प्रत्यक्षदर्शी निदर्शनास आले. त्यात हजारो ई मेल येतात कुणाला कुणाला उत्तर द्यायची असे अजब उत्तरे ऐकावयास मिळाली.पुणे युनिव्हर्सिटीने निष्काळजीपणाने त्या आलेल्या ई – मेल ला दिलेली उत्तरे,यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे करिअरचे बळी जात आहे.त्यांचे शिक्षण करियर बरबाद होत आहेत.तसेच गोरगरिबांची मुलं,कष्ट करत शिक्षण घेण्यापासून वंचित राहत आहेत. पुणे विद्यापीठाकडून पी एन आर नंबर चा घोटाळा निष्काळजीपणे हाताळला जात आहे. ज्यामुळे एका क्लिकवरच विद्यार्थ्यांचे आयुष्य धुळीला मिळत आहेत. आणि या नरक् यातना भोगायला लावण्याच पाप हे पुणे युनिव्हर्सिटी चे कि महाराष्ट्र शासना चे अध्याध्याशाचे हा दुर्दैवी शोध घ्यावा लागत आहे.