बातमी 24तास ऑनलाईन न्यूज पोर्टल
(पुणे वृत्त सेवा), पुणे शहरातील नवी पेठ येथील सैनिकी मुलींच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षिका हे तात्पुरत्या स्वरूपातील अशासकीय एक पद भरण्याकरिता २३ ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रिया राबविण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.निवड झालेल्या उमेदवाराला २४ हजार ७९ रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक पत्नी, विधवा पत्नी व इतर महिला नागरीक यांनी २३ ऑक्टोबर पर्यंत आपले अर्ज सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे सादर करावेत.अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक एम. व्ही. कांबळे भ्रमणध्वनी क्रमांक ९५१८३७४८६३ वर उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (निवृत्त) यांनी केले आहे.