बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज(प्रतिनिधी, सम्राट राऊत) कामासाठी घराबाहेर गेलेल्या 19 वर्षीय मुलाला देवदर्शनाला जायचं सांगून त्यास दारू पाजून खून करून खुनाचा गुन्हा लपवण्यासाठी तृतीयपंथी बनून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोघा जणांच्या म्हाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळून जेरबंद केले असल्याची माहिती म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.याबाबत हरीराम यादव (रा.कुरुळी,ता.खेड,जि.पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा सचिन हरिराम यादव ( वय.१९ वर्षे रा. पुणे-नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि.पुणे) याच्या याचे अपहरण करून केल्याप्रकरणी गोरख जनार्धन फल्ले (वय.३२ वर्षे, रा कानडी रोड,ता.केज,बिड ) रोहित शिवाजी नागवसे (वय. २२ वर्षे, राजवळबंद,ता केज, जि.बीड) यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील कुरुळी गावातून सचिन हरिराम यादव हा मुलगा ( दि. २४/०८/२०२३) ला दुपारी दोनच्या सुमारास घरातून काही कामानिमित्त बाहेर गेला मात्र परत आला नाही.पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा १ च्या पथकाने सदर मुलगा दिवसभरात फिरलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासून पाहिले असता,खेड (सेझ) एमआयडीसी परिसरात दोन अनोळखी इसमांबरोबर असल्याचे दिसून आला.त्यातील एक इसम रोहीत नागवसे हा सदर मुलाचे चाळीत भाड्याने रहात होता.तो सुध्दा गायब असल्याची माहिती समोर आल्यावर गोरख फल्ले याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दुसरा आरोपी रोहित नागवसे याच्यासोबत हरवलेल्या (मिसिंग)मुलाला निमगाव परीसरात देवदर्शनासाठी नेऊन मुलाला परीरारातील जंगलात दारू पाजुन त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केल्याची माहिती दिली.त्यानंतर रोहित नागवसे हा आपली ओळख लपवून तृतीयपंथी बनून मुंबई येथील वसई- विरार परिसरात गायत्री नावाने राहत होता.पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता दोघांनी मिळून हा खून केला असल्याचा गुन्हा कबूल केला आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख,पोलीस हवालदार फारुक मुल्ला,प्रमोद हिरळकर,अमित खानविलकर,सचिन मोरे,विशाल भोईर,प्रमोद गर्जे, स्वप्निल महाले,नितेश बिच्चैवार यांच्या पथकाने तपास केला.