बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल राजगुरूनगर:पाईट(ता:खेड) येथील द इलाईट स्कूल & जुनियर कॉलेज या शाळेमध्ये यावर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात भामा आसखेड धरण या ठिकाणी करण्यात आले, शाळेमध्ये पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
नुकत्याच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर अलगदपणे चंद्रयान उतरले आणि आणि भारताची चंद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाली याची प्रतिकृती सजावटी साठी नैसर्गिक साधनांचा वापर करून तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक ओरिगामी चे साहाय्याने चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेचा संदेश देण्यात आला होता. सजावटीचे काम शाळेतील सर्व शिक्षिक, व स्टाफ यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका, पल्लवी जयसिंग दरेकर यांनी सर्वांचे आभार मानले.