आंब्याची झाडे लावून केले, वडिलांच्या स्मृतींचे जतन. खराबी कुटुंबीयांचा पर्यावरण पूरक उपक्रम.

Share This News

बातमी 24तास, ऑनलाईन न्यूज पोर्टल

(चाकण, प्रतिनिधी) जुन्या पिढीतील शेतकरी निवृत्ती (आप्पा) खराबी यांचे नुकतेच निधन झाले. खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजीराजे खराबी व उद्योजक गोविंद खराबी यांचे ते वडील, माजी जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदस्या अरुणाताई खराबी यांचे ते सासरे, तर माजी उपसरपंच प्रकाश खराबी, उद्योजक सुभाष खराबी, जालिंदर खराबी, भैरवनाथ सोसायटीचे संचालक तानाजी खराबी व माजी सरपंच योजनाताई सोमवंशी यांचे ते चुलते होत.कै.निवृत्ती अहिलु खराबी, यांच्या आठवणी जतन व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश भाऊ खराबी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबीयांनी रक्षाविसर्जन आंब्याची झाडे लावून आठवणी जतन ठेवल्या आहेत. यावेळी त्यांचे बंधू, मुले नातवंडे व नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe To Our Youtube Channel...!

X

Copright Protected Content Cant Copy