दिनांक 17 सप्टेंबर व 18 सप्टेंबर 2023 रोजी जुन्नर तालुक्यातील एकूण 11 गावातील अभ्यासू व प्रगतशील द्राक्ष बागायतदार यांचा सातारा येथे कृषी टेक प्रा.ली. कंपनीचे एकूण चार मॅन्युफॅक्चर युनिट येथे प्रत्यक्ष उत्पादनाची कशी निर्मिती केली जाते त्याचा सखोल अभ्यास करण्यात आला. व कंपनीच्या प्रत्येक प्रॉडक्ट बद्दल माहिती घेतली. महाबळेश्वर व पाचगणी येथे स्ट्रॉबेरी , मध संशोधन केंद्र व त्रिवेणी पॉईंट, गुरेघर निसर्ग पथ, मॅप्रो कंपनी व व इतर सर्व नैसर्गिक परिसराचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर वाईचा महागणपती व मांढरदेवीची काळुबाई यांचे दर्शन घेऊन अभ्यास सहलीचा समारोप केला.
या अभ्यास सहलीसाठी कृषी टेक प्रा.ली. कंपनीचे मालक बाळासाहेब शिंदे , टेरिटरी मॅनेजर भाऊसाहेब पवार व हर्षली कृषी उद्योग नारायणगाव चे प्रोप्रा.नारायण आरोटे यांचे अभ्यास सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
या शेतकरी अभ्यास सहल मध्ये जुन्नर तालुक्यातील 11 गावातील अभ्यासू व जगाच्या पाठीवरती निर्यातक्षम द्राक्ष पिकवणारे प्रगतशील 32 द्राक्ष बागायतदार सहभागी झाले होते ते असे मंगेश घोडेकर, राजेंद्र वायकर, जयसिंग शेठ वायकर, विकास ढवळे, सतीश शेठ नेहरकर, संतोष जाधव, शिव शंकर मांडे, बाळासाहेब शिंदे, संदीप नेहरकर, विलास वायकर, विशाल शिंदे, सुमित गायकवाड, युवराज वायकर, दत्तात्रय ढवळे, शिवाजी नेहरकर, नितीन ढवळे, प्रताप डुंबरे, सचिन ढवळे, किशोर हाडवळे, समाधान ढवळे, तुषार नेहरकर, विठ्ठल थोरात, संतोष कातोरे, गणेश गावडे, स्वप्निल दरेकर, विपुल पवार, वल्लभ औटी, अशोक ताम्हणे, सयाजी औटी. हेमंत खेबडे या सर्वांनी सहभागी होऊन महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.